आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड फ्रायडेला येशूच्या बलिदानाची आठवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अखिल मानव जातीकरिता येशू खिस्ताने क्रुसावर आपले बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण करीत क्षमा, प्रेम, अहिंसा व त्याग ही येशूची शिकवण जीवनात कायम ठेवण्याचा संकल्प उपासनेतून करण्यात आला. शुक्रवारी पांडे डेअरी चौकातील दी ख्रिश्चन अँण्ड मिशनरी अलायन्स ऑफ इंडिया संचलित फ्रेंड विल्यम शिलँडर मेमोरिअल अलायन्स चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांचा सामूहिक उपासनेचा कार्यक्रम झाला.
शहरातील ख्रिस्ती बांधवांतर्फे 14पासून दु:ख सोसण्याच्या आठवड्याचे आयोजन केले होते. या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आले. गुडफ्रायडेनिमित्त शुक्रवारी सामूहिक उपासना सभेचा कार्यक्रम झाला. यावेळी अमरावतीचे धर्मगुरू डॉ. प्रमोद तंतरपाळे हे प्रमुखवक्ते होते, त्यांनी येशू खिस्तांच्या चरित्रावर मार्गदर्शन केले. आजच्या समाजाला प्रभू येशूंच्या प्रेम, अहिंसा, आणि त्यागाच्या शिकवणीची नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
दु:ख सोसण्याच्या आठवड्याचा समारोप
रामानंदनगररोडवरील चर्चमध्येही सामूहिक उपासनेचा कार्यक्रम झाला. अलायन्स चर्चचे सचिव आर.बी.इंगळे, खजिनदार एस.बी. गावित, प्रकाश शिंदे (एल्डर), पंचसदस्य प्रकाश आठवले, रोबेन आठवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शनिवारी सायंकाळी 7 ते 9 व रविवारी इस्टर संडेनिमित्त सकाळी 9 ते 12 यावेळेत प्रमोद तंतरपाळे हे येशू ख्रिस्तांच्या जीवनावर व्याख्यान देतील. येशूच्या पुनरुत्थानाची उपासना या विषयावर ते मार्गदर्शन करतील व प्रभूभोजन विधीने दु:ख सोसण्याच्या आठवड्याचा समारोप होईल.