आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड मॉर्निंग पथक झाले गायब, हागणदरीमुक्तीसाठी अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव - उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर पालिकेतर्फे कारवाईचा बडगा उगारल्या गेल्यानंतरही त्याला जुमानता आज अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसत आहे. तर काही महाभाग पालिकेचा निधी घेऊनही उघड्यावर शौचास जात असल्याने विदारक अवस्था असून गुड मॉर्निंग पथक देखील गायब झाले आहे. यामुळे शहर हगणदारीमुक्ती अडचणी निर्माण होत आहे. अशा स्थितीत सुज्ञ नागरिकांकडून असे केल्या जात असल्याने शहराच्या दृष्टीने एक अभिशापच म्हणावा लागेल. 

 

येथील नगरपालिकेतर्फे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर चाप बसावा, शहराला उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांकडून मुक्ती मिळावी, जनतेचे आरोग्य चांगले राहावे शहर हगणदारीमुक्त व्हावे, यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या. त्यातील एक नागरिकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली होती. या पथकातील अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या भागात जाऊन अनेकांवर कारवाई करत होते. त्यामध्ये त्याची गावातून मिरवणूक काढणे, दंड आकारणे, त्याच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणे याचा समावेश होता. कारवाईचा बडगा उगारुन सुध्दा आजमितीस अनेक भागातील नागरिक उघड्यावर शौचास बसत आहे. शहराची लोकसंख्या लाखाच्यावर गेली आहे. परंतु नागरिकांना पालिका प्रशासनाकडून प्राथमिक सुविधा ज्या प्रमाणात उपलब्ध करुन द्यावयास पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचा अभाव दिसून येत आहे. 


शहरातील काही भागातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था खराब झाली आहे. नगर पालिकेने कचरा उचलण्याचा कंत्राट दिला आहे. सफाईसाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली, ठेका पद्धतीने मजूर लावले. परंतु त्याचा फारसा फायदा झालेला दिसुन येत नाही. सार्वजनिक शौचालयाची देखभाल दुरुस्तीसाठी कोणतेही अभियान नगर पालिकेने राबविले नसल्याने अनेक जण पर्याय नसल्याने उघड्यावर शौचास बसत आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. शहरातील अनेक खुल्या जागेत नागरिक उघड्यावर शौचास बसत आहे. अशा अनेक ठिकाणावरुन नागरिकांची रहदारी असल्याने त्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेतर्फे शहराला उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून मुक्ती मिळावी, यासाठी युद्धस्तरावर अभियान चालविण्यात आले. यामध्ये उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांचे टमरेल जप्त करणे, वाजत गाजत त्यांची घरापर्यंत मिरवणूक काढणे, त्यांना दंड ठोठावणे, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणे आदी कारवाया करण्यात आल्या. यामुळे काही दिवस नागरिक उघड्यावर शौचास बसतांना दिसून आले नाही. त्यामुळे शहर शौचमुक्त झाले असे वाटत होते. परंतु अभियान बंद झाले आणि परत नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचे दिसून येत आहे. 

 

खामगाव शहर अद्यापही हागणदारीमुक्त काेसो दूरच 
नगरपालिकेतर्फे विविध उपाय योजना केल्यानंतर देखील उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर चाप बसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर हागणदारीमुक्तीचे स्वप्न अद्याही कोसो दूरच असून प्रशासनाच्या वतीने या अभियानास गती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

 

पुन्हा पथक होणार आठवडाभरात कार्यान्वीत 
या अाधीगुडमॉर्निंग पथक कार्यान्वीत होते. यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांची संख्या नगन्य झाली होती. त्यामुळे या पथकाने कारवाई थांबविली होती. तर आता परत तक्रारी येत असल्यामुळे हे पथक येत्या आठवड्यात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करुन कार्यान्वीत करण्यात येणार आहे. पाहणी दरम्यान जे लोक उघड्यावर शौचास बसलेले दिसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 
- एन.पी. नाफडे, प्रभारी आरोग्य अभियंता, नगरपालिका खामगाव. 

बातम्या आणखी आहेत...