आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ यार्डात मालगाडीचे घसरले डबे हटवले, मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक सुरळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- भुसावळ यार्डात मालगाडीचे घसरलेले चार डबे रूळांवरून हटवण्यात आले असून मुंबई- नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई- हावडा गितांजली एक्स्प्रेस ही पहिली गाडी तब्बल आठ तासांनी नागपूरकडे रवाना झाली.

शनिवारी पहाटे साडेचार वाजता भुसावळ स्टेशनपासून जवळच असलेल्या रेल्वे यार्डात मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले होते. सुदैवाने जीवीतहानी झाली नसली तरी भुसावळ-नागपूर रेल्वे मार्गावरील अप व डाऊन लाइनवरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, दोन्ही मार्ग सुरळीत झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले...
मुंबई- नागपूर व मुंबई- दिल्ली रेल्वे मार्गावरील भुसावळ हे महत्त्वाचे स्टेशन आहे. दिवसभरात हजारो रेल्वे गाड्या या मार्गावरून ये-जा करतात. मात्र, मालगाडेचे चार डबे रुळावरुन घसरल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला होता. नागपूरकडून मुंबईकडे येणार्‍या व मुंबईकडून नागपूरकडे जाणार्‍या गाड्या तब्बल 8-10 तास उशीराने धावत आहे.

दरम्यान, मालगाडीचे डबे हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्ग सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले आहे.