आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे यांच्या भूमिकेबाबत तर्क-वितर्कांवर चर्चा, जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात शांतताच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात अागामी काळात येणाऱ्या निवडणुका, माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात कमालीची शांतता अाहे. खडसे यांची जिल्ह्यातील अागामी भूमिका काय असणार? यावरच बहुतांश राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांची भूमिका अवलंबून असल्याने राजकीय तर्क-वितर्कांना सध्या ऊत अाला अाहे.

येत्या वर्षभरात जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या अाणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा हंगाम अाहे. यात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात अाहेत. जिल्ह्यात काेणते राजकीय पदाधिकारी, राजकीय पक्ष यांची युती, अाघाडी असेल, कुणाची छुपी हात मिळवणी असेल याबाबत गेल्या दाेन महिन्यांपासून चर्चा सुरू झाली हाेती. विधान परिषदेसंदर्भात काही उमेदवारदेखील निश्चित मानले गेले हाेते. परंतु, माजी मंत्री खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय शक्यतादेखील बदलल्या अाहेत. खडसेंची राजकीय ताकत पाहता अागामी निवडणुकीत अाणखी समीकरणे बदलू शकतात, अशी शक्यता हाेती. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अाणि भाजपदेखील स्वतंत्रपणे लढण्याच्या मानसिकतेमध्ये अाहेत. परंतु, या पक्षांतील पदाधिकारी साेईनुसार राजकीय अॅडजेस्टमेंट करण्याचीदेखील शक्यता अाहे.
पुढे वाचा...
> राजकीय पदाधिकाऱ्यांचीही भूमिका
बातम्या आणखी आहेत...