आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीविषयक कायद्याची माहिती सरकार देत नाही : एकनाथ खडसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- जमीन खरेदी प्रकरणात सर्व बाबी पुढे येत अाहेत. त्याची चौकशी सुरू आहे. राज्यात जमिनीची इतर  दुसरीही प्रकरणे झाली अाहेत. मात्र,  त्यावर सरकारने काही पावले उचलली नाही. त्यामुळे अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये अाहे. सरकार विधिमंडळात एमअायडीसीच्या सन १९९५च्या कायद्याची माहिती देत नाही, असा अाराेप करीत माजी मंत्री व भाजपचे अामदार एकनाथ खडसे यांनी  हा कायदा मृत झाला अाहे का, असा प्रश्नही केला.   

ते म्हणाले की, ‘खान्देशात भाजपचे अस्तित्व नगण्य होते. त्या वेळी पक्षवाढीसाठी सर्वत्र फिरलो, कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. आता पक्षाचे सरकार सत्तेत आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट विसरता येणार नाही. पक्षापासून बहुजन समाजही दूर होता तो जोडला.  मंत्रिपद गेल्यानंतर खान्देशचे नुकसान झाले आहे. ’
बातम्या आणखी आहेत...