आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Employees Neglect Election Duty, Divya Marathi

अशीही शासकीय शक्कल: इलेक्शन ड्यूटी रद्द करण्यासाठी शासकीय कर्मचार्‍यांची धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - येत्या 24 एप्रिल रोजी होणार्‍या मतदानासाठी शासकीय कर्मचारी, अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आदेश निघताच नियुक्ती रद्द करण्यासाठी कर्मचार्‍यांकडून जिल्हा प्रशासनाकडे बहाण्यांचा पाढा वाचला जात आहे. वैद्यकीय फायलींसह शारीरिक व्याधींचे पुरावे देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रांगा लावल्या जात आहेत.
मतदानासाठी नियुक्ती झाल्यानंतर त्यासंबंधी प्रशिक्षण घेणे आणि आदल्या दिवशी नियुक्तीच्या ठिकाणी हजेरी लावणे कर्मचार्‍यांच्या जीवावर येत असल्याची स्थिती आहे. यातून वाचण्यासाठी नियुक्ती करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांकडे अर्जांचा पाऊस पडत आहे. दरम्यान, वैद्यकीय अडचणींचे पुरावे दिल्याने काही जणांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोणत्याही कारणाशिवाय काही कर्मचारी बहाणे करून नियुक्ती रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी दबाव, वशिला आणि खोटे पुरावे आदींचा फंडा उपयोगात आणला जात असल्याची स्थिती आहे.