आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घेतली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - थॅलेसेमियाची रुग्ण सातवर्षीय अनुष्काच्या उपचारावरील खर्चाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली अाहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे ‘आेएसडी’ आेमप्रकाश शेट्ये यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये अनुष्कावर मुंबईत उपचार केले जातील, असेही शेट्ये म्हणाले.

‘सात वर्षीय अनुष्काला ९७ वेळा दिले रक्त’ असे वृत्त ‘दिव्य मराठी’च्या शुक्रवार (दि.१०)च्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने घेतली. रावेरमधील ज्ञानेश्वर चौधरी यांची अनुष्का ही कन्या असून जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून थॅलेसेमिया आजाराने ती ग्रस्त आहे. दर १५ दिवसांनी तिला रक्त द्यावे लागते. या आजारामुळे तिला आतापर्यंत ९७ वेळा रक्त दिले गेले आहे. तिच्यावरील शस्त्रक्रियेसाठी १५ लाखांचा खर्च येणार आहे. मात्र, एवढा मोठा खर्च चौधरी कुटुंबीयांना पेलवणे शक्य नाही. त्यामुळे हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून चिंतेत होते.
अनुष्कासंदर्भातील वृत्त "दिव्य मराठी'ने प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी तिच्या वडिलांना फोन करून मदत करण्याची तयारी दर्शवली. अनुष्काच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार असल्याची बातमी जेव्हा ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने चाैधरी यांच्या घरी जाऊन कळवली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. अनुष्काचे वडील ज्ञानेश्वर चौधरी व आई पल्लवी यांचे डोळे पाणावले. याबद्दल त्यांनी ‘दिव्य मराठी’चे ऋण व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...