आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भुसावळ- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने आतापर्यंत केवळ 329 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी 24 जूनपासून सुरू आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेवर धाव घेतली. यामध्ये केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, पहिल्याच दिवसापासूनच ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मंदगतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास सायबर कॅफेवर ठाण मांडावे लागले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 23 रुपये फी घेतली जाते. खासगी ठिकाणी मात्र 100 रुपयांपेक्षा जास्त खर्च लागतो. तरीही वेळेचा अपव्यय होतोच. त्यातच मध्ये येणार्या अडचणींमुळे जलदगतीने आनलाइन अर्ज भरणे शक्य होत नाही. या कासवगतीमुळे आतापर्यंत केवळ 329 विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज भरले आहेत. अर्ज भरल्यानंतर पोहोचपावती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जामनेररोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जावे लागते. यामुळे पुन्हा अतिरिक्त भुर्दंड बसतो. यापूर्वीसुद्धा प्रवेश प्रक्रियेमध्ये अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांंना मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
सुटीच्या दिवशी कामकाज
विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी रविवारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली होती. खासगी सायबर कॅफेवर गती मंद असल्याने वेळेचा अपव्यय होतो. -प्रवीण ठाकरे,निदेशक, शासकीय औद्योगिक संस्था, भुसावळ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.