आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government News In Marathi, Paid10 Crore Then Also Situation Same, Divyamarathi

दहा कोटी रुपये भरूनही कर्जाचा आकडा ‘जैसे थे’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुडकोच्या कर्जाचे सेटलमेंट करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने दरमहा 4 कोटी रुपये भरणे सुरू केले आहे. आतापर्यंत 10 कोटी रुपये भरणा करूनही कर्जाचा आकडा मात्र कमी झालेला नसल्याची बाब समोर येत आहे. पालिका भरत असलेली काही रक्कम व्याज तर काही रक्कम मुद्दलीत जमा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे झालेले नसल्याने प्रशासन हुडकोचे हप्ते थांबविण्याच्या मन:स्थितीत आहे.
घरकुल उभारणीसाठी तत्कालीन नगरपालिकेतर्फे 1998 मध्ये हुडकोकडून 141.34 कोटी कर्ज घेतले होते. कर्जापोटी पालिकेने आज अखेर एकूण 189 कोटी 12 लाख रुपये भरले आहेत. यात मुद्दलची रक्कम केवळ 25 कोटी 54 लाख तर व्याज 163 कोटी 58 लाख आहे. एवढे पैसे भरूनही पालिकेवर 435 कोटी रुपये कर्ज बाकी असल्याचा दावा हुडको कडून केला जात आहे. वसुलीसाठी हुडकोने डीआरटी (ऋण निर्देश न्यायालय) मध्ये धाव घेतली आहे. कर्जाची तडजोड करण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांच्यातर्फे प्रय} सुरू आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे दरमहा ठरावीक रक्कम एस्क्रो अकाउंटमध्ये जमा करणे सुरू केले आहे. या स्वतंत्र एस्क्रो अकाउंटमध्ये जानेवारीअखेर पालिकेने 10 कोटी रुपये भरले आहेत.
न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा
वनविभागाचे मुख्य वनरक्षक विरुद्ध जिल्हाधिकारी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांनी दाखल केलेले रिट पिटीशन क्रमांक 3414 / 1982 वर सुप्रीम कोर्टाने 18 फेब्रुवारी 2003 मध्ये निकाल दिला आहे. या निकालात दोन्ही शासकीय विभाग असल्याने कोर्टात न जाता समन्वयाने मार्ग काढण्याचा निकाल झाला होता. चर्चेतून मार्ग काढल्यास हुडको तयार नसल्यास या निकालाचा संदर्भ घेत पालिकेसमोर न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा आहे.
महापालिका प्रशासन आले हुडकोचे कर्ज हप्ते थांबविण्याच्या मन:स्थितीत