आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलांबाबत दिवसांत देणार शासनाला प्रस्ताव, चर्चेनंतर हालचाली गतिमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्याकोट्यवधी रुपयांच्या जागांवरील घरकुले अपूर्णावस्थेत पडून आहेत. या घरकुलांचा विकास म्हाडाच्या माध्यमातून करून मिळणाऱ्या उत्पन्नातून हुडकोचे देणे द्यावे यासाठी महापालिका आठवडाभरात राज्यशासनाला प्रस्ताव देणार आहे. सध्याची बिकट अवस्था पाहता शासनाने केंद्राला विनंती करून हुडकोचा हप्ता कमी करून द्यावा, अशीही विनंती केली जाणार आहे.
पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत पालिकेतील सत्ताधारी खाविआच्या नेत्यांनी केलेल्या सकारात्मक चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी हालचाली गतिमान झाल्या आहेत. महासभेत यासंदर्भात एक ठरावही पारीत केला आहे. त्यात शहरातील अपूर्ण पडलेल्या घरकुलांच्या माध्यमातून कर्जफेडीचा पर्याय शोधला आहे. शासनाच्या म्हाडामार्फत या घरकुलांचा विकास करावा. त्यासाठी घरकुलांच्या किमती निश्चित कराव्यात. लाभार्थ्यांना घरकुल दिल्यानंतर झालेला खर्च म्हाडाने काढून घ्यावा. तसेच उर्वरित पैसा हा हुडकोच्या कर्जफेडीसाठी वर्ग करावा यासंदर्भातील प्रस्ताव आठवडाभरात शासनाला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हप्ता एक कोटीवर आणा
ठरावातहुडकोला देण्यात येणाऱ्या हप्त्याची रक्कम कमी करण्याची विनंती करण्यात येणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार प्रशासकीय खर्चही भागवला जात नाही. त्यामुळे तीन कोटी देणे अडचणीचे ठरत आहे. त्यासाठी शासनाने केंद्राला विनंती करून हप्ता कोटींवरून कोटी करून द्यावा, अशी विनंतीही प्रस्तावाद्वारे करण्यात येणार असल्याचे खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी सांगितले.