आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय रेकाॅर्ड रूम बनली कबुतरखाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूच्या इमारतीमधील शासकीय दस्तएेवज असुरक्षित अाहेत. रेकाॅर्ड रूम असलेल्या या इमारतीच्या समाेरील बाजूने कुलूप लावले असले तरी, मागील बाजूने सर्व खिडक्या नेहमीच खुल्या असतात. त्यामुळे हे रेकाॅर्ड असुरक्षित असल्याची स्थिती अाहे. पाऊस अाणि अागीपासून धाेका तसेच कबुतरांच्या वास्तव्यामुळे शासकीय रेकाॅर्ड रूम कबुतरखाना बनला अाहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या इमारतीमध्ये सर्व शासकीय दस्तएेवज रेकाॅर्ड रूममध्ये लाकडी रॅकवर ठेवण्यात अालेले अाहेत. मात्र, या रूमच्या मागील बाजूच्या सर्वच खिडक्या खुल्या अाहेत. त्यामुळे एखाद्या खिडकीतून कागदपत्रे लांबवणे सहज शक्य असल्याने या रेकाॅर्डला चाेरट्यांपासूनदेखील धाेका अाहे. काही खिडक्या नादुरुस्त असल्याने पाऊस अाणि अागीपासून रेकाॅर्डला धाेका अाहे. तसेच खिडक्या खुल्या असलेल्या या रेकाॅर्ड रूममध्ये कबुतरांचे वास्तव्य असल्याने अनेक रेकाॅर्ड त्यांनी कुरडतले अाहे.

कागदपत्रे असुरक्षित
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस कारागृह अाहे. या कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांना भेटी देणारे शेकडाे नागरिक या भागात येतात. तसेच शासकीय गाेदामदेखील असल्याने तेथे अनेक कामगार येतात. मात्र, अनेक जण रेकाॅर्ड रूमच्या भिंतीला लागूनच धूम्रपान करत असतात. पावसाळा अाणि उन्हाळ्यातही या रूमच्या खिडक्या खुल्याच असतात. या खिडक्यांतून कबुतरे, उंदीर रूममध्ये सहज प्रवेश करू शकतात. त्यामुळे रेकाॅर्ड सुरक्षित नसल्याचे लक्षात येते.

काय आहे रेकॉर्ड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या इमारतीमध्ये सर्व शासकीय दस्तएेवज रेकाॅर्ड रूममध्ये लाकडी रॅकवर ठेवण्यात अालेले अाहेत. परंतु हे दस्तऐवज असुरक्षित असल्याने चांगल्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

यापूर्वी अागीचे तांडव
जिल्हाधिकारी कार्यालयात सन २००९मध्ये रेकाॅर्ड रूमला अाग लागून अनेक महत्त्वाची कागदपत्रे फायली खाक झाल्या हाेत्या. शाॅर्ट सर्किटमुळे ही अाग लागल्याचा तेव्हा निष्कर्ष काढण्यात अाला हाेता; परंतु त्यानंतरदेखील रेकाॅर्डची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात अालेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.