आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब तुझे सरकार: देशसेवेत तिसरी पिढी, पण गावात नळ मिळेना!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- कुछफर्क नही पडता
राज काैरवाें का रहे या पांडवाें का
जनता ताे बेचारी द्राैपदी है...
उपहासगर्भअशा या शब्दांमधून कवीने सत्ताधीश अाणि प्रजा यांच्यातील भेदक विसंगती मार्मिकरीत्या मांडली अाहे. तिसरी पिढी सीअारपीएफमध्ये असलेल्या साकरीच्या मेहेरे कुटुंबाला नळ कनेक्शन घेताना या कवितेचा प्रत्येय येत अाहे.

भुसावळ तालुक्यातील साकरीतील शेखरसिंग मेहेेरे हा जवान गडचिराेलीत सीअारपीएफमध्ये सेवा बजावत अाहेत. त्याचे वडील भगवानसिंग अाणि अाजाेबा मानसिंग मेहेरे हे दाेघेही याच सेवेतून निवृत्त झाले अाहेत. पाेटाला चिमटा देऊन बचत केलेल्या पैशांतून त्यांनी अलीकडेच अापली कर्मभूमी असलेल्या साकरीच्या विस्तारित भागात एक घर बांधले अाहे. स्थानिक ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन द्यावे म्हणून देशसेवेसाठी अायुष्य समर्पित करणारे हे कुटुंब अनेक अाठवड्यांपासून पाठपुरावा करत अाहे. पंचायत समिती ते जिल्हाधिकारी अशा सर्वच कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही हंडाभर पाण्यासाठी नळ कनेक्शन मिळत नसल्याने हे कुटुंब हताश झाले अाहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या कुटुंबाला तातडीने नळ कनेक्शन देण्याचे पत्र या ग्रामपंचायतीला १७ डिसेंबर २०१५ राेजी दिले अाहे. मात्र, तरी या कुटुंबाची समस्या सुटलेली नाही, हा तर कळस अाहे.

पदाधिकारी, प्रशासनाची मुजाेरी
ग्रामपंचायतीकडेशेखरसिंग मेहेरे यांनी नळ कनेक्शन मिळावे, असा अर्ज दिला हाेता. त्यानंतर २१ जानेवारी २०१५ राेजी झालेल्या मासिक सभेत हा विषय मांडला गेला. त्यात ‘बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नळ कनेक्शन देण्यात यावे’, असा ठरावही करण्यात अाला. मात्र, घराचे बांधकाम पूर्ण हाेऊनही नळ कनेक्शन देण्यासाठी या कुटुंबाला हेलपाटे घालावे लागत अाहेत. विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचना, पत्रांनाही मुजाेर पदाधिकारी, प्रशासन जुमानत नसल्याने त्यांनी प्रजासत्ताकदिनी उपाेषण करण्याचा इशारा ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिला.

अाता मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
नळकनेक्शन देण्यासाठी ग्रामपंचायतीने जी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली अाहे, त्याच्याविराेधात अाता मुख्यमंत्री, पालकमंत्री अाणि ग्रामविकास मंत्र्यांना शनिवारी निवेदन देणार असल्याची माहितीही मेहेरे कुटुंबीयांनी दिली. तिसरी पिढी देशसेवेसाठी समर्पित असलेल्या या राष्ट्रप्रेमी कुटुंबावर ‘ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाे, मला नळ कनेक्शन देता का नळकनेक्शन’ असे अार्जव करण्याची वेळ येऊन ठेपली असून ही बाब लाजिरवाणी अाहे.

टँकरने पाणी देण्याचा पर्याय
भूखंडविकसित करताना संबंधित विकसकाने मूलभूत सेवा पुरवणे बंधनकारक अाहे. मात्र, मेहेरे कुटुंबाच्या अर्जानुसार ग्रामपंचायतीच्या बैठकीत चर्चा झाली हाेती. पदाधिकाऱ्यांचा नळ कनेक्शन देण्यास विराेध अाहे. असे असले तरी अाठवड्यातून त्यांना एक वेळा टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विचार पुढे अाला अाहे. प्रशासकीय पातळीवर याेग्य ताे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न अाहे.
-ए.डी.खैरनार, ग्रामविकास अधिकारी