आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grahak Manch Order Against Indian Railway At Jalgaon

साडेपाच लाखांची भरपाई देण्याचे ‘रेल्वे’ला आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हरदा येथून जळगावला रेल्वेने येणार्‍या महिलेच्या बॅगेतील सोन्याची चोरी झाल्याप्रकरणी ग्राहक मंचात दाखल तक्रारीत महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. त्यात तक्रारदार महिलेला साडेपाच लाख रुपये अदा करण्याचे आदेश देण्यात आला आहे.
तक्रारदार नम्रता राहुल जैन यांचे हरदा (मध्य प्रदेश) येथे सासर असून त्या 5 फेब्रुवारी 2007 रोजी जळगाव येथे माहेरी येण्यासाठी पठाणकोट एक्स्प्रेसने निघाल्या होत्या. बॅगेतील साडेपाच लाखांचे सोने चोरीस गेले होते. याबाबत त्यांनी जळगावला उतरल्यानंतर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. म्हणून त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. परंतु त्यासंदर्भात काय झाले याबाबत कळविण्यात आलेले नाही. त्यांच्या नुकसानीस भुसावळ येथील सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, जनरल मॅनेजर तसेच द युनियन ऑफ इंडियातर्फे डिव्हिजनल मॅनेजर हे जबाबदार असल्याचे जैन यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी ग्राहक मंचात दावा दाखल केला होता.
रेल्वेने तक्रारदार जैन यांना 5 लाख 50 हजार रुपये 10 टक्के व्याजाने अदा करावेत. शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक त्रासापोटी 15 हजार रुपये व अर्जाच्या खर्चापोटी 10 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्य चंद्रकांत येशीराव यांनी दिले. तक्रारदारतर्फे अँड.हेमंत भंगाळे यांनी काम पाहिले.