आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींमध्ये आता येणार महिलांचे "राज', गावगाडा रावेरातील 436 पैकी 241 जागा झाल्या राखीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर- तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींची वाॅर्ड रचना प्रभागनिहाय आरक्षण बुधवारी (दि. २८) जाहीर करण्यात आले. यात एकूण ४३६ जागांपैकी १९५ जागा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाकरिता तर तब्बल २४१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार आहे.
तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामुळे ग्रामीण भागात इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकतेच ग्रामपंचायतींची प्रभागरचना आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार एकूण ४३६ जागांपैकी २४१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ४१ तर पुरुषांसाठी २२ जागा आहेत. अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण पुरुषांसाठी २३ तर महिलांकरिता ३७ जागा राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, सर्वसाधारण पुरुष ५३, तर महिलांसाठी ६२ जागा सोडण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून ९७ जागा पुरुष तर सर्वसाधारण १०१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तालुक्यात आगामी जुलै ते डिसेंबरदरम्यान ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व
४६ पैकी काही ग्रामपंचायती महसूलमंत्री खडसे यांच्या प्रभावक्षेत्रातील आहेत. तर माजी आमदार अरुण पाटील, राजाराम महाजन, शिक्षण आरोग्य सभापती सुरेश धनके, पंचायत समिती उपसभापती सुनील पाटील, बाजार समिती सभापती योगिराज पाटील यांच्या ग्रामपंचायतींची निवडणुकही गाजेल.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चुरस
४६पैकी राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या काही ग्रामपंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. यात शिक्षण आरोग्य सभापती सुरेश धनके यांच्या प्रभावक्षेत्रातील रसलपूर, रमजीपूर, खिरोदा आणि बक्षीपूर या चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील, ऐनपूर, निम्बोल, कोचूर बुद्रूक, सुलवाडी, तांदलवाडी, वाघाडी, खिर्डी खुर्द, निंभोरा बुद्रूक, रेभोटा, पुरी-गोलवाडे, कोळदा, मांगलवाडी, दसनूर, धामोडी, उदळी बुद्रूक, मस्कावद बुद्रूक आदी गावांचाही समावेश आहे. तर खासदार रक्षा खडसे यांनी नुकतेच मॉडेल गाव करण्यासाठी निवडलेल्या विवरे खुर्दची निवडणूकही गाजणार आहे.