आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातवाला वाचवायला गेलेल्या अाजाेबाचाही रेल्वेतून पडून मृत्यू, चाळीसगाव येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - धुळे-चाळीसगाव रेल्वे पॅसेंजरमधून उतरण्यासाठी दरवाजाजवळ आलेल्या १३ वर्षीय नातवाचा तोल गेला. तो खाली पडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबाचाही तोल गेल्याने ते खाली पडले आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना शहरातील धुळे रेल्वेलाइनच्या बोगद्याजवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.

अाेमप्रकाश विजय महाजन (वय १३) त्याचे अाजाेबा जयराम गजमल महाजन (वय ६५) अशी दोघांची नावे आहेत. ते दोघेही धुळे येथे गेले होते. ते मूळचे तळई (एरंडाेल) येथील रहिवासी हाेत. कुंझर (ता.चाळीसगाव) येथे जयराम महाजन यांचा मुलगा विजय महाजन यांनी मेडिकल व्यवसाय सुरू केला हाेता. त्यामुळे कुटुंबीय तेथेच वास्तव्यास हाेते. नातू अाेम दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या नातीच्या शिक्षणासाठी जयराम महाजन हे वृद्ध पत्नीसह चाळीसगाव येथे धुळे राेडवरील पाेस्टल काॅलनीत राहत हाेते. ओम हा इयत्ता सातवीत गुड शेफर्ड शाळेत शिकत हाेता. दोघेही धुळे येथून धुळे-चाळीसगाव पॅसेंजरने परतत होते. चाळीसगाव स्टेशन अवघ्या काही अंतरावर असल्याने अाेम उतरण्याच्या बेतात हाेता. त्यासाठी ताे दाराजवळ अाला हाेता. त्याचा ताेलगेला. ताे खाली पडत असल्याचे पाहून आजोबा त्याला वाचविण्यासाठी पुढे सरसावले. त्यात त्यांचाही ताेल गेला. रेल्वे प्लॅटफाॅर्मला लागण्याअाधीच दोघेही खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात चाळीसगाव पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे.
पुढे वाचा...
> आई-वडिलांचा आक्रोश
> अन् पित्याचा मृतदेह समाेर