आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजीबाईंनी पै-पै जमा केलेले पैसे उंदीर, घुशींकडून फस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव - पूर्वी बँका नसल्याने कष्टाने कमवलेले पैसे व काही महत्त्वाच्या चीजवस्तू घरात पुरून ठेवल्या जात असत. नंतरच्या काळात ग्रामीण भागात बँकेचे जाळे विस्तारले गेले तरी जुने लोक मात्र जमिनीत पैसे पुरण्यापेक्षा घरातील डब्यात अथवा भांड्यात पैसे ठेवू लागले.

शहरातील आझादनगर चौकातील आजीबाईंवर मात्र या प्रकाराने आफत ओढवली. तिने जमविलेल्या तब्बल 50 हजार रुपयांवर उंदीर व घुशींनी डल्ला मारला. नोटांचे काही तुकडे आजीबाईंच्या हातात पडले. शहरातील अनुसयाबाई (नाव बदलेले) यांना दोन मुले. दोघेही नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. आजीबाईंचे पती गेल्या अनेक दिवसांपासून बाहेरगावीच आहेत. ते सरकारी नोकरीला होते. त्यांना निवृत्ती वेतन मिळते. त्यांनी आपल्या पत्नीला दर महिन्याला खर्चासाठी दिलेले पैसे लाख मोलाचे होते.


सर्व नोटा फाटल्या
उंदीर व घुशींनी काही नोटा फस्त केल्या तर काही फाटलेल्या अवस्थेत मिळून आल्या. यातील एकही नोट चिटकवून चलनात येण्यासारखी नव्हती. अनुसयाबाईंना दोन दिवसांपूर्वी सकाळी आठवण आल्यावर तिने दुधासाठी पैसे काढण्यास भांड्यात हात घातला तर फाटलेल्या नोटा त्यांच्या हाताला लागल्या. त्यांनी अर्शू ढाळले. त्यापेक्षा बँकेत पैसे ठेवले असते तर आज ही आफत ओढवली नसती, असे सांगून ती रडत होती.

पै-पै जमा करून बचत
गेल्या चार वर्षांपासून अनुसयाबाई यांनी पतीने दिलेले पैसे थोडे-थोडे वापरले. शिलकीतून तिने तब्बल 45 ते 50 हजार रुपये जमवले. नातवाचा सांभाळ करण्याबरोबरच त्याच्या शाळेचा सर्व खर्च याच पैशातून होत होता. त्यांनी 100, 500 व 50 रुपयांच्या नोटा घरातील भांड्यात जमा करून ठेवले होते. भांड्यावर झाकण होते, परंतु झाकण तेलाचे भरल्याने उंदीर व घुशींना त्याचा वास लागला. त्यांनी झाकण उघडून थेट नोटांवर डल्ला मारला.