आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाना-नानी पार्क’चे दत्त जयंतीला भूमिपूजन, पार्क झाल्यानंतर नागरिकांना निवांत बसता येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाना-नानी पार्कसाठी तयार करण्यात अालेला अारखडा. - Divya Marathi
नाना-नानी पार्कसाठी तयार करण्यात अालेला अारखडा.
जळगाव - काव्यरत्नावलीचाैकात उभारण्यात येणाऱ्या नाना-नानी पार्कचे भूमिपूजन दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर अर्थात १३ राेजी करण्यात येणार अाहे. त्यानंतर १६ हजार २०० चाैरस मीटर जागेत पार्कच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार अाहे. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार अाहे.
पाच लाख लाेकसंख्येच्या जळगाव शहरात एखाद/दाेन उद्यान साेडले तर संपूर्ण शहरात नागरिकांना निवांत बसता येईल, असे एकही उद्यान नाही. त्यात शहराचा विस्तार झपाट्याने हाेत असल्याने गांधी उद्यान बहिणाबाई उद्यानात येण्यासाठी सर्वांनाच साेईचे हाेत नाही. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांत उद्यान उभारण्याची गरज व्यक्त हाेत अाहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने जैन उद्याेग समूहाच्या सहकार्याने काव्यरत्नावली चाैकाला लागून असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विश्रामगृहास लागून असलेल्या जागेत नाना-नानी पार्कचे नियाेजन केले अाहे.

१६ हजार २०० चाैरस मीटर जागेत पार्क
जवळपास१६ हजार २०० चाैरस मीटर जागेत नाना-नानी पार्कचे उद््घाटन करण्यात येणार अाहे. याच जागेत श्री गुरूदत्तांचे लहान मंदिर असून या ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजनाचे नियाेजन केले अाहे. या वेळी जैन उद्याेग समूहाचे अध्यक्ष अशाेक जैन, महापाैर नितीन लढ्ढा, उपमहापाैर ललित काेल्हे, पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अायुक्त जीवन साेनवणे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे उपस्थित राहतील.
बातम्या आणखी आहेत...