आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना-नानी पार्कचे भूमिपूजन, तीन महिन्यांत काम पूर्ण करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काव्यरत्नावली चाैकात उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री डाॅ. भवरलाल जैन थीम पार्कच्या कामाला मंगळवारी दत्त जयंतीनिमित्ताने सुरुवात करण्यात अाली. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात अाले. येत्या तीन महिन्यांत पार्कचे काम पूर्ण करण्यात येऊन २५ फेब्रुवारीला उदघाटन करण्यात येणार अाहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास विकास साध्य हाेऊ शकताे. भविष्यातदेखील अशाच पद्धतीने सर्वांचे सहकार्य राहिल्यास शहरात विविध याेजना राबवण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
काव्यरत्नावली चाैकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विश्रामगृहाला लागून असलेल्या १६ हजार २०० चाैरसमीटर जागेत नाना-नानी पार्क विकसित करण्यात येणार अाहे. घरातील प्रत्येक वयाेगटासाठी उपयुक्त असे हे पार्क असणार अाहे. या पार्कच्या उद््घाटनाप्रसंगी जैन उद्याेग समूहाचे अध्यक्ष अशाेक जैन, माजी मंत्री सुरेश जैन, कविवर्य ना. धाें. महानाेर, महापाैर नितीन लढ्ढा, पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर, अायुक्त जीवन साेनवणे, उपमहापाैर ललित काेल्हे, सभापती वर्षा खडके, दलिचंद जैन, नितीन बरडे, विष्णू भंगाळे, ज्याेती चव्हाण, श्यामकांत साेनवणे, किशाेर पाटील, सुनील महाजन, जितेंद्र मुंदडा, अमर जैन उपस्थित हाेते. मंत्राेच्चारात पूजा करण्यात अाली. कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात अाले.

जैन समूह घेणार पार्कची काळजी
जळगावशहरामध्ये अद्ययावत सुविधा असलेले सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी हक्काचे, विरंगुळ्याचे ठिकाण असावे म्हणून महापौर नितीन लढ्ढा यांचा पाठपुरावा सुरूच हाेता. सध्या अस्तित्वात असलेली सर्व झाडे आहे तशीच ठेवून जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन संचालक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी थीम पार्कचा आराखडा तयार केला आहे. पार्कची कायमस्वरूपी काळजी घेण्याचेही काम जैन उद्याेगसमूह करणार आहे.

- महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
-संपूर्ण थीम पार्कमध्ये ऊर्जापूरक रंगसंगतीचा वापर.
-पाथ-वेवर पावसाळ्यात सुद्धा काेणीही पाय घसरून पडू नये म्हणून अंॅटिस्किड स्टाेन व्हिट्रीफाइड टाइल्स.
-अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी येथे विशेष सुविधा.
-काही माेजकी झाडे रिप्लांट केली जाणार अाहेत.
-ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, पक्ष्यांसाठी दाणापाण्याची विशेष सुविधा.
- सार्वजनिक न्यूजपेपर रीडिंग डेस्क.
- लहान-माेठ्या सांस्कृतिक संगीत कार्यक्रमांसाठी अॅम्फीथिएटर.
- चार प्रशस्त लाॅन्स, अाेपन जिम, एराेबिक्स, याेगासन वर्गासाठी विशेष सुविधा.
- लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी शॅलाे वाॅटर बाॅडी, स्थानिक कलाकरांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अार्ट गॅलरी.
३.३ एकरातअसेल पद‌्मश्री डाॅ. भवरलाल जैन थीम पार्क.
०२ प्रवेशद्वार पार्कला महाबळ राेडकडून अारटीअाे अाॅफिसकडून असतील.
१५ फुटांचाप्रशस्त वाॅक-वे पार्कमध्ये असेल.
१२५ प्रेक्षकांची अासन क्षमता असणारे व्हिडिअाेटाेरियम- एलसीडी स्क्रीन प्राेजेक्टर.
बातम्या आणखी आहेत...