आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगाला झाेंबणाऱ्या थंडीने शहर गारठले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाठवडाभरात अालेली थंडीची लाट अधिक तीव्र झाली अाहे. उत्तरेतील थंड वाऱ्यांमुळे शहरात हुडहुडी वाढली असून, जळगावचे तापमान तब्बल ८.२ अंशांपर्यंत खाली अाले अाहे. पहाटे कडाक्याची थंडी अाणि गडद धुक्याचा परिणाम जळगावकरांच्या पहाटेच्या जनजीवनावर झाला अाहे.
अाॅक्टाेबर ते डिसेंबरदरम्यान अधूनमधून जाणवणारी मध्येच गायब झालेली थंडी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात परतली अाहे. उत्तरेतील थंडीच्या लाटेचा परिणाम अाता जळगावसह मराठवाडा विदर्भात जाणवत अाहे. वाऱ्यांमुळे अंगाला झाेंबणारी थंडी पहाटेच्या शाळकरी विद्यार्थ्यांना नकाेशी झाली अाहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम जाणवत अाहे. शहरात थंडीचा ऋतू अाेसरल्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत असलेल्या स्वेटर विक्रेत्यांकडे या अाठवड्यात पुन्हा गर्दी वाढली अाहे. थंडीची लाट परतल्यामुळे स्वेटर अादी उबदार कपड्यांच्या िवक्रीत पुन्हा वाढ झाली अाहे. वाऱ्यांचा वेग किलाेमीटर प्रतितास एवढा असल्याने थंडी अंगाला अधिक झाेंबत असल्याची स्थिती अाहे. नाशिकचा पारा अंशांपर्यंत खाली अाला. नागपूरचे तापमान अंशांपर्यंत घसरले अाहे.

माॅर्निंग वाॅकसाठी उशीराने गर्दी
बुधवारपासूनथंडीत वाढ झाल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. गेल्या दाेन दिवसांत थंडीमुळे शहर गारठल्याने पहाटे माॅर्निंग वाॅकसाठी फुलणाऱ्या रस्ते, मैदानांवरही पहाटे ५.५० वाजता दिसणारी गर्दी अाता उशिराने ७.३० ते वाजता रस्त्यावर दिसत अाहे. थंडीमुळे पहाटेच्या शाळा अधिक प्रभावित झाल्या अाहेत. सायंकाळी ते वाजेदरम्यान बाजारपेठेत जाणवणारी गर्दी ७.३० वाजेनंतर सामसुम झाल्याचे जाणवते. शनिवारचा बाजार असूनही गर्दी अाेसरली हाेती.

वाताचे रुग्ण सांभाळा
^मकरसंक्रांती नंतर थंडीकमी हाेते. परंतु, या वेळी थंडी वाढली अाहे. हिवाळा अाराेग्यदायी असला तरी वाताच्या रुग्णांना त्याचा त्रास हाेताे. संधीवाताचे दुखणे वाढते, अशावेळी रुग्णांनी अतिथंड पाणी, थंड अाहार घेणे टाळावे. हृदयासाठीही अतिथंड पाणी हिवाळ्यात जाेखमीचे ठरत असते. डाॅ. धिरज देवरे

अाराेग्याच्या समस्या
वाढत्याथंडीमुळे सर्दी, खाेकला, तापाचे रुग्ण वाढले अाहेत. संधिवाताचेही रुग्ण वाढले अाहेत. जनरल प्रॅक्टिशनर डाॅक्टरांकडे रुग्णांची गर्दी वाढली अाहे.