आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला उशीर झाल्यास नवरदेवाला दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लग्नवेळेत लागल्याने लांबवरून येणार्‍या नातेवाइकांचा वेळ वाया जातो. नाचगाणे आणि बँड, डीजेमुळे वाढत जाणारी झिंग वेळेत रोखण्यासाठी धोबी समाजातील काही ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन उशिरा लग्न लावणार्‍या वराकडील मंडळींना दंड करण्याची पद्धत सुरू केली आहे. या निर्णयामुळे सकारात्मक परिणाम पुढे येत आहेत.

डीजे, बँड, नाचगाणे यामुळे विवाहाला होणारा उशीर आता सवयीचाच झाला आहे. लग्न मुहूर्तावर लागण्यास वऱ्हाडी मंडळी वरपक्ष त्याच्या मित्रमंडळींना दोषी धरते. या प्रकारामुळे येणारे नातेवाईक, मित्रमंडळींना अनावश्यक वेळ वाया जात असल्याने मनस्ताप वाढतो. एकाच दिवशी अनेक सोहळे असल्यास दुसर्‍या कार्यक्रमाला हजेरी लावणे शक्य होत नाही. तसेच लग्न वेळेत लागत नसल्याची आधीच मनाशी खूणगाठ बांधून अनेक जण येणेच टाळतात. भविष्यात ही प्रथा समाजाच्या विकासासाठी घातक असल्याने ती बदलण्यासाठी धोबी समाजातील एक गट पुढे आला आहे. सन २००८ मध्ये मुहूर्तावर लग्न लावणार्‍यांकडून ५०० ते ८०० रुपये दंड आकारणे, त्याबाबत वराकडील मंडळींना आधीच कल्पना देणे, दंडाची नोंद ठेवणे, अशी पद्धत सुरू केली आहे.

‘कडू घासा’तही बदल
प्रकाशखर्चाणे, राजेश जाधव, गणेश पेढे, गणेश वाघमारे, बारकू थोरात, सुनील खर्चाणे, अनिल वाघ, दिलीप सुरसे, दिलीप शेवाळे, सुधाकर कापसे या मंडळींनी एकत्र येऊन ही पद्धत सुरू केली. तसेच निधनानंतर होणार्‍या कडू घासाच्या पद्धतीमध्ये देखील सर्वानुमते बदल केला आहे.

समाजकार्यासाठी खर्च
वर्षातूनएखाद-दुसर्‍या लग्नात उशिरा लग्न लावल्याबद्दल दंड आकारला तर त्याची सर्वत्र चर्चा होते. ही बाब टाळण्यासाठी इतर लग्नांमध्ये वराकडील मंडळी वेळेत लग्न लागण्यासाठी काळजी घेत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दंडाची रक्कम मोठी नसली तरी त्यामुळे बदनामी होऊ नये, तसेच पाहुण्यांचे आपल्याप्रति चांगले मत राहावे म्हणून अनेक लग्ने वेळेत लागत आहेत. मुहूर्त सोडून २० मिनिटांपेक्षा अधिक उशीर झाल्यास दंड आकारला जातो. ही रक्कम विधायक कार्यासाठी वापरली जाते.