आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या महिला अाघाडी सदस्यनाेंदणीतही गटबाजी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सदस्य नाेंदणीकार्यक्रमातच गटबाजीचे धडे गिरवले जात असल्याचे चित्र निर्माण झाल्यानेजिल्‍हा भाजप पुन्हा एकदा चर्चेत अाली अाहे. जळगावात पाच जिल्ह्यांच्या महिला अाघाड्यांची सदस्यनाेंदणी कार्यशाळा अायाेजित केली हाेती. या कार्यशाळेसाठीजिल्‍ह्यातील माेजक्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. मात्र, या सदस्यनाेंदणी अभियानाचे राज्याचे सहप्रमुख सुनील बढे यांना जळगावात असूनही निमंत्रण दिले नव्हते, हेविशेष.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक अाणि अहमदनगर या पाचजिल्‍ह्यांतील महिला अाघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना सदस्यनाेंदणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जळगावातील ब्राह्मण संघाच्या सभागृहात कार्यशाळेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी महिला अाघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ,जिल्‍हाध्यक्ष उदय वाघ, महिलाजिल्‍हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, किशाेर काळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रयाग काेळी, वासंती चाैधरी, दीपक सूर्यवंशी, प्रा.सुनील नेवे, पूनम काेलते उपस्थित हाेते. पक्षाच्या सदस्यनाेंदणी अभियानाच्या सहप्रमुखपदाची जबाबदारी मिळालेले सुनील बढे हे सध्या जळगावात अाहेत. या कार्यशाळेसाठीजिल्‍हाध्यक्ष अाणि सरचिटणीस उपस्थित असताना पक्ष कार्यालयात बसलेल्या सुनील बढे यांना मात्र निमंत्रण देण्यात अाले नव्हते. हा प्रकार लक्षात अाल्यानंतर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बढेंना डावलल्याचे कारण मात्र कळू शकले नाही.
मला निमंत्रण नव्हते
-मंगळवारीमी जळगाव शहरातच हाेताे. पक्ष कार्यालयात अाल्यानंतर या कार्यशाळेबद्दल मला माहिती मिळाली. त्यामुळे मी स्मिताताईंना फाेन केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. निमंत्रण नसल्यामुळे कार्यशाळेला जाऊ शकलाे नाही. सुनीलबढे, राज्यसहप्रमुख, भाजप सदस्यनाेंदणी अभियान
जागतिक पातळीवर सदस्यनाेंदणीचा विक्रम नाेंदवण्यासाठी सुनील बढे राज्यभर फिरत अाहेत. सहप्रमुख असल्यामुळे ते प्रत्येकजिल्‍ह्यात जात अाहेत. साेमवारी सकाळी १० वाजता ते पुण्यातून जळगावात दाखल झाले. दुपारी ते पक्ष कार्यालयात अाले हाेते. तेथे थाेडा वेळ बसल्यानंतर त्यांना या कार्यशाळेविषयी माहिती मिळाली. सदस्यनाेंदणीचा विषय असल्यामुळे त्यांनी अाघाडीच्या प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.