आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी मागवले कामांचे स्वतंत्र प्रस्ताव, कर्जाची परतफेड विकासकामांबाबत महापाैरांशी सकारात्मक चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : महापालिकेवरील कर्जाची परतफेड असाे की विकासकामे, यासंदर्भात नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. पाठपुरावा करण्यासाठी साेईस्कर व्हावे यासाठी प्रत्येक विषयाचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून सद्य:स्थिती मांडावी, अशी सूचना महापाैरांना केली अाहे. सर्व विषयांचा अभ्यास करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे अाश्वासन दिले. 
 
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अाचारसंहिता जाहीर झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रशासकीय दाैरा रद्द झाला. त्यामुळे गुरुवारी महापाैर नितीन लढ्ढा यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करून मनपाच्या समस्यांबाबत निवेदन देत त्यातून मार्ग काढण्यासाठी मदतीचा हात देण्याची विनंती केली. या वेळी अामदार सुरेश भाेळे, भरत अमळकर, नगरसेवक नितीन बरडे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित हाेते. महापाैरांनी पालकमंत्र्यांना दाेन निवेदने दिली. 
शहरातील विकास कामांबाबत सकारात्मक चर्चेत पालकमंत्री पाटील यांनी निवेदन देण्यासाेबतच मनपाने प्रत्येक विषयावर प्रस्ताव तयार करावा. त्या विषयाची सद्य:स्थिती मांडावी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एका व्यक्तीवर जबाबदारी निश्चित करावी. त्यामुळे प्रश्नही मार्गी लावण्यात मदत हाेईल, अशी सूचना केल्याचे महापाैरांनी सांगितले. 
 
वाघूरचे ८५ काेटी माफ करा : भाजप 
महापालिकेतीलभाजपच्या नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत शहराच्या विकासासाठी मदतीचा हात देण्याची विनंती केली. यात पालिकेकडे वाघूरची ८५ काेटी रुपयांची थकबाकी झाली अाहे. मनपाची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ती थकबाकी राज्य शासनाने माफ करावी ,अशी मागणी केली आहे. यासाेबत फुले मार्केट इतर व्यापारी संकुलांचाही प्रश्न साेडवण्याचे साकडे घातले. 
 
घनकचरा प्रकल्प सुरू हाेण्यासाठी निधी मिळावा, शहर बससेवा सुरू हाेण्यासाठी प्रयत्न करावा, अादी मागण्या करण्यात अाल्या. या वेळी विराेधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते सुनील माळी, नगरसेवक पृथ्वीराज साेनवणे, विजय गेही, उज्ज्वला बेंडाळे, जयश्री पाटील, ज्याेती चव्हाण यांच्यासह नगरसेवक उपस्थित हाेते.
 
कर्जफेड, गाळे अनुदानाची मागणी 
मनपाने हुडकाेकडून १४१ काेटींचे कर्ज घेतले हाेते. त्यापाेटी अातापर्यंत सुमारे २७५ काेटी भरले अाहेत. या कर्जातून मुक्तता करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने राज्य शासन, हुडकाेचे अधिकारी केंद्रीय मंत्री यांच्यासाेबत पालिकेची बैठक घ्यावी. तसेच हुडकाेने अाकारलेले अवास्तव व्याज, पिनल इंटरेस्ट तसेच अन्य दायित्व माफ करावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे चार वर्षांपासून अडकून पडलेला गाळ्यांचा प्रश्नही मार्गी लावण्याची विनंती केली. 
 
या वेळी समांतर रस्त्यांसाठी ४० काेटी, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी २५ काेटी, भाेईटेनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी ४५ काेटी, रस्त्यांसाठी ५० काेटी, कर्मचाऱ्यांचे देणे अदा करण्यासाठ ५० काेटी जिल्हा बॅंक कर्जफेडीसाठी ४० काेटी असा २५० काेटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...