Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Guardian Minister Suresh Shetti In Dhule District Tour

पालकमंत्री शेट्टी 27 ला जिल्हा दौ-यावर

प्रतिनिधी | Apr 20, 2012, 08:56 AM IST

  • पालकमंत्री शेट्टी 27 ला जिल्हा दौ-यावर

धुळे । जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश शेट्टी 27 एप्रिल रोजी धुळे जिल्हा दौ-यावर येत आहेत. या दौ-यात ते जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व टंचाईचा आढावा घेतील, अशी माहिती आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली. टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय पथकाने पाहणी केली. त्यानंतर आमदार प्रा. पाटील यांनी पालकमंत्र्यांनी टंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आमदार प्रा. पाटील यांनी मंत्री शेट्टी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री 27 एप्रिलला जिल्ह्यात येतील, अशी माहिती आमदार प्रा. पाटील यांनी दिली. अक्कलपाड्यातील पाणी सोडल्यामुळे झालेल्या डांगरवाड्यांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करून त्यांनाही मदत द्यावी, अशीही मागणी आ. शरद पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. बैठकीत विविध विषयांवर चर्चा होईल.

Next Article

Recommended