आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujrat NCP State President Jayant Patel Oppose FIR In Shirpur

गुजरात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; नोकरीचे आमिष दाखवून घेतले 14 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर- नोकरी लावण्यासाठी दिलेले 14 लाख रुपये परत मागणार्‍यास जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पटेल यांच्याविरुद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जगतसिंग राजपूत (48, रा. शिरपूर) यांनी यासंदर्भातील फिर्याद दिली आहे. राजपूत व पटेल यांची जुनी ओळख आहे. गुजरातमध्ये कुणास नोकरी हवी असल्यास मदत करण्याचे आश्वासन पटेल यांनी दिले होते. त्यावर विश्वास ठेवून 2010मध्ये मित्रास नोकरी लावण्यासाठी राजपूत यांनी पटेल यांना 14 लाख रुपये दिले. पैसे देऊन तीन वर्षे उलटल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने राजपूत यांनी जयंत पटेल यांच्याकडे वेळोवेळी पैशांसाठी तगादा लावला; परंतु त्यांनी पैसे दिले नाहीत. 24 जून व 1 जुलै रोजी राजपूत हे पटेल यांना त्यांच्या मूळ गावी चिकोद्रा (ता. आणंद, जि. बडोदा) येथे जाऊन भेटले. त्या वेळी 6 जूनला पैसे देतो असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, 4 व 5 जूनला जयंत पटेल यांनी प्रकाश राजपूत यांना भ्रमणध्वनीद्वारे पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे काल शनिवारी रात्री प्रकाश राजपूत यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
त्यावरून आमदार जयंत पटेल यांच्याविरोधात भादंवि 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धमकी दिल्याने तक्रार
जयंत पटेल व माझे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. त्यांना पैसे दिल्यावर नोकरीचे काम हमखास होईल, असे वाटल्याने 14 लाख रुपये रोख दिले. आपल्या पदाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी लगेचच पैसे देणे अपेक्षित होते. भ्रमणध्वनीवर उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्या वेळी त्यांनी पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र, शिवीगाळ व जाळून ठार मारण्याची धमकी देत असल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देणे भाग पडले.
-प्रकाश राजपूत, फिर्यादी