आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा एकनाथ खडसे हाडवैरी गुलाबराव पाटीलांच्या घरी जातात, वाचा संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संवाद साधताना (डावीकडे) आमदार गुलाबराव पाटील. - Divya Marathi
माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संवाद साधताना (डावीकडे) आमदार गुलाबराव पाटील.
जळगाव - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील निवासस्थानी भेट घेतली. आमदार पाटील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने खडसे यांनी गुलाबरावांचे सांत्वन केले. अवघ्या पाच ते आठ मिनिटांची ही भेट होती.

खडसे गुलाबराव दोघेही राजकीय हाडवैरी. जिल्हा बँक निवडणुकीनंतर दोघांमधील राजकीय वैर विकोपाला गेले होते. एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी दोघेही सोडत नव्हते. खडसे मंत्रिपदावर असताना गुलाबरावांनी आरोप केले. त्यामुळे गुलाबरावांच्या मुलाच्या विवाहाच्या दिवशीच खडसेंनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यांच्या परस्परांवरील टीकेमुळे गेल्या तीन महिन्यांत खान्देशातील उन्हापेक्षाही राजकीय वातावरण अधिक तापले होते.
गेल्या पंधरवड्यात खडसेंचे मंत्रिपद गेले, तर आमदार पाटील यांना म्हसावदच्या पद्मालय शिक्षण संस्थेतील गैरप्रकाराबद्दल तुरुंगात जावे लागले. त्याच दिवशी गुलाबरावांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी गुलाबरावांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले होते. मात्र, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असूनही खडसे गुलाबरावांच्या भेटीला गेले नसल्याने कुजबुज सुरू होती. बुधवारी खडसे मुंबईहून जळगावात दाखल झाले. आधी ते त्यांच्या मुक्ताई बंगल्यावर गेले. त्यानंतर दुपारी १२ वाजता पाळधीला गेले.

पुढील स्लाइडवर वाचा, गुलाबरावांच्या घरी झालेल्या दोन राजकीय प्रतिद्वंद्वीच्या भेटीचा हा वृत्तांत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...