आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूग्रह 27 दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवग्रहांपैकी मंगलकारी, कल्याणकारी म्हणून ओळखला जाणारा गुरू अर्थात बृहस्पती 27 दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर गेला आहे. खगोल आणि ज्योतिषीय भाषेत बोलायचे झाल्यास सध्या गुरूचा अस्त सुरू आहे. या काळात कुठलेही संस्कारित कार्य होणार नसल्याचे ज्योतिषांकडून
सांगण्यात आले.

खगोलशास्त्रानुसार सूर्याच्या सरळ रेषेत कोणताही ग्रह आल्यानंतर तो पृथ्वीवरून दिसत नाही. या घटनेला ग्रहाचा अस्तगत काळ म्हटले जाते. याकाळात ग्रहावरून परावर्तीत होऊन पृथ्वीवर येणारी सूर्याची सूक्ष्म किरणे आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव शून्य असतो. ज्योतिषशास्त्रात गुरू आणि शुक्राच्या अस्तगत कालावधीला महत्त्व आहे. हे दोन्ही ग्रह शुभ मानले गेले आहेत. त्यामुळे या ग्रहांचा अस्तगत काळ असताना होम-हवन, विवाह कार्य, मंगल कार्य करण्याचे टाळले जाते. गुरूच्या अस्तगत कालावधीच्या जोडीला यंदा चतुर्मासही आला आहे.

खगोलीय परिणाम : गुरू ग्रहावर हायड्रोजन व हेलियम वायू आहेत; त्याशिवाय मिथेन, अमोनिया, सिलिकॉन घटकांचाही काही प्रमाणात समावेश आहे. सूर्याच्या तुलनेत याची वायुमंडलीय तीव्रता दोन ते तीन टक्के जास्त आहे. सौर मंडलातील ग्रहांच्या संयुक्त द्रव्यमानाच्या तुलनेत एकट्या गुरूचे द्रव्यमान अडीच पट आहे. त्यामुळे या ग्रहाची सूक्ष्म चुंबकीय किरणे पृथ्वीवर सूक्ष्म परिणाम करतात.