आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्या सान्निध्यात गेल्यावर शांती मिळते, त्याला संत म्हणतात - बालयोगीजी महाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालयोगीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना आशीर्वचन दिले. - Divya Marathi
बालयोगीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना आशीर्वचन दिले.
चोपडा - दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त महामंडलेश्वर बालयोगीजी महाराज यांच्या अमृतवाणीचा लाभ घेण्यासाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो भाविक उपस्थित होते. पूर्ण परिसर जय नारायण, जय नारायण हरी बोल हरी बोल अशा जयघोषाने दुमदुमून निघाला. या कार्यक्रमाला चोपडा तालुक्यातील पंधरा हजार भाविकांनी गर्दी केली होती, तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. 
 
यांची होती प्रमुख उपस्थिती
-या वेळी संत नारायण स्वामी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उद्योजक विठ्ठल गुजराथी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील, कैलास पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, जिल्हा परिषदेचे सभापती प्रभाकर सोनवणे, चंद्रहास गुजराथी, गोपाल पाटील, जगन्नाथ पाटील, नंदकिशोर पाटील, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, कवी रमेश पाटील, अमृतराज सचदेव, गिरीश पाटील, दगडू अग्रवाल, दिनकर देशमुख, पंकज बोरोले, तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी गुजरातेतूनही भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. 
 
ज्याच्या सान्निध्यात गेल्यावर शांती मिळते, त्याला संत म्हणतात
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आलेल्या हजारो भक्तांना आपल्या अमृतवाणीतून संदेश देताना बालयोगीजी महाराज यांनी सांगितले की, पाप करणाऱ्याला पाप मिळतेच, पण पाप पाहणाऱ्यालाही महापाप लागत असते. द्रौपदीच्या वस्त्रहरणाची कथा या वेळी संत बालयोगीजी महाराज यांनी सांगून पापाला डोळा देणाऱ्याला महापाप लागत असते, असे ते म्हणाले.
 
गुरुपौर्णिमेनिमित्त दिले शुभाशीर्वाद
-गुरूपौर्णिमेचे मोठे महत्त्व असून सातही समुद्रांची शाई केली तरी गुरूंची महती लिहिली जाणार नाही. ज्याच्या सान्निध्यात गेल्यावर मनाला शांती प्राप्त होते त्याला संत म्हणतात, असे म्हणून बालयोगीजी महाराज म्हणाले की, मी चोपडा तालुक्याच्या सुखशांतीसाठी दररोज माळा जपत असतो. मी आज गुरूपोर्णिमेनिमित्त हृदयापासून खूप खूप आशीर्वाद देत आहे.

भाविकांना दिला शाकाहारी होण्याचा संदेश
आपण कथेतून उठून गेल्यानंतर एक प्रण करा, संकल्प करा, आजपासून मांसाहार करणार नाही, जरूर संकल्प करा. ज्याच्या घरात मांसाहार होत असेल त्या घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही. मांसाहार करून हत्या करू नका, आपण शाकाहरी जीवन जगा असा संदेश या वेळी संत बालयोगी महाराज यांनी दिला.
- सूत्रसंचालन अमृतराज सचदेव यांनी केले. प्रवीण राजपूत व त्याच्या सहकाऱ्यांनी संगीताची साथ दिली. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, पंकज समुहाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांनी कथेच्या अगोदर मनोगत व्यक्त करून संत बालयोगीजी महाराजांबद्दल गौरवद्गार काढले.

पंधरा हजार भाविकांना महाप्रसाद
चोपडा तालुका जय नारायण परिवारातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या विशाल कार्यक्रमाला पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. यावेळी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
बातम्या आणखी आहेत...