आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपुष्य लाभाचा आज प्रभातसमयीच अमृत मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सोने खरेदीसाठी सर्वात्तम मानल्या जाणार्‍या गुरुपुष्यामृतदिनी (दि. 13) सकाळी 6 वाजेपासून 7.55 वाजेपर्यंत लाभ-अमृत मुहूर्त आहे. असे असेल तरी शहरातील सराफी पेढय़ा सकाळी सहा वाजता सुरू राहणार नाहीत. हा मुहूर्त येण्याची गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी घटना आहे.

हिंदू पंचांगानुसार सोने व रत्न खरेदीसाठी पुष्य नक्षत्रावर येणारा गुरुवार अत्यंत लाभदायी मानला जातो. याच दिवसाला गुरुपुष्यामृत संबोधले जाते. सन 2013 मधील हे शेवटचे गुरुपुष्यामृत असल्यानेदेखील त्याला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या दिवशी सोनेखरेदी केली जातेच; मात्र या दिवशी लाभ-अमृत योगावर केलेली सोने खरेदी धनसंचयासाठी सर्वोत्तम मानली जाते. सराफी पेढय़ा गुरुवारी सकाळी सुरू राहणार नसल्याने जळगावकरांना प्रभातसमयीचा लाभ मुहूर्त साधता येणार नाही. मात्र सायंकाळचा अमृत मुहूर्त साधण्याची पर्वणी मिळणार आहे.

उत्तरायणामुळे महत्त्व
वर्षातील शेवटचे गुरुपुष्य उत्तरायणात येते आहे. हा अतिशय शुभ कालखंड असतो. त्यामुळेच या मुहूर्तावर सोने खरेदी म्हणजे अक्षय्य धनसंचय असल्याची ग्राहकांची श्रद्धा आहे, असे विद्यावाचस्पती डॉ. प्रसादशास्त्री कुलकर्णी यांनी सांगितले.

खरेदीची तयारी
सोन्याचे शिक्के, नाणी, बिस्किट, वेढणे यांच्या मुहूर्तावरील खरेदीसाठी तयारी केली असून, दागिने नियमित वेळेत मिळतील, असे आर.सी. ज्वेलर्सचे सुशीलकुमार बाफना यांनी सांगितले.