आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gutaka Issue In Jalgaon, Food Security Department Alert

गुटखाप्रकरणी जळगाव अन्नसुरक्षा विभाग सतर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासनातर्फे गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरीही पानटपर्‍यांवर सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात केवळ विक्रीच नव्हे तर बनावट गुटखा निर्मितीही होत असल्याचा संशय अन्नसुरक्षा विभागाला असल्याने जिल्ह्यातील काही विशिष्ट ठिकाणांवर विभाग लक्ष ठेवून आहे. शहरातील साठय़ांवर कारवाईनंतर या विभागातर्फे जिल्ह्यातील इतर ठिकाणची माहिती संकलित करणे सुरू केले आहे. अजिंठा चौफुली परिसरात जप्त करण्यात आलेल्या गुटखा प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या पुढची कारवाई म्हणून संबंधितांवर खटलेही दाखल करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त बी.यू.पाटील यांनी स्पष्ट केले.