मेहुणबारे- येथू्नजवळच असलेल्या चिंचगव्हाण फाट्यावर संशयित अायशर ट्रकचा पाेलिसांनी पाठलाग केला असता, त्यातून ३० लाख रुपयांचा गुटखा हैद्राबादहून बडाेद्याकडे वाहून नेला जात असल्याचे उघड झाले. पाेलिसांनी याप्रकरणी चालकास ताब्यात घेतले असून अवैध गुटखा विक्री करणाऱ्या अांतरराज्य टाेळीचा पर्दाफाश केला अाहे.
ही कारवाई अपर पाेलिस अधीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने केली. चिंचगव्हाण फाट्यावर पाेलिसांनी अायशर ट्रक (क्रमांक ए.पी.२३ वाय-८२८९) ला हात दाखवून अडविण्याचा प्रयत्न केेला असता चालकाने ट्रक सुसाट नेला. त्यामुळे पाेलिसांचा संशय बळावला. त्यांनी ट्रकचा दीड किलाेपर्यंत पाठलाग केला. ट्रकमध्ये ५० किलाे वजनाच्या ६० गाेण्या गुटखा भरलेल्या मिळून अाल्या. पाेलिसांनी ट्रक मेहुणबारे पाेलिस स्टेशनला जमा केला.
सहायक पाेलिस निरीक्षक दिलीप कार्ले, जयवंत सातव, अहिरे, पाेलिस हेड काॅंन्स्टेबल शालीग्राम पाटील, महेंद्रसिंग पाटील, रवींद्र हाडपे, संजय पाटील, सुधीर महाजन, ईश्वर पाटील यांनी ही कारवाई केली. ट्रकमालक महंमद अब्दुल अफराेज, चालक लालफडी रवी (रा.मेरठ) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. यापैकी चालकास अटक करण्यात अाली अाहे. हैद्राबाद येथील कटारिया कुरियरच्या नावाची पावती चालकाजवळ मिळून अाली अाहे.
अन्न सुरक्षा अधिकारी दाखल
दुपारी२.३० वाजता ट्रक पकडल्यावर सायंकाळी वाजता जळगाव येथून अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप साेनवणे, संदीप देवरे मेहुणबाऱ्यात अाले. तेव्हा ट्रकमधील गाेण्या बाहेर काढण्यात अाल्या. त्यांनी पंचनामा केला असता ३० लाखांचा गुटखा असल्याचे लक्षात अाले. माल पाेहच करणारी पावती बनावट असल्याचा संशय अाहे.
अाॅइलच्याबॅरलवर गाेण्या
ट्रकमध्येवीज कंपनीचे नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर अाॅइलचे चार बॅरल प्रथमदर्शनी होते. त्यावर गुटख्याच्या गाेण्यांवर फडके टाकून ठेवलेले हाेते. पाेलिसांनी ट्रकची तपासणी केल्यावर त्यांना अाॅइलचा वास अाला. अात डाेकावून फडके हटवले असता त्याखाली प्रत्येकी ५० किलाे वजनाच्या ६० गाेण्या मिळून अाल्या.