आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा तस्करी सुरूच : साडेसोळा लाखांचा मुद्देमाल, तपासणीत होते डोळेझाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बळीरामपेठेत ट्रकमधून अॅपेरिक्षात विमल पान मसाला जर्दाच्या पुड्या उतरवत असताना ‘दिव्य मराठी’च्या एका वाचकाने पाहिल्यानंतर ‘दिव्य मराठी’ कार्यालयात फोन केला. त्यानंतर तत्काळ स्पॉटवर पोहोचलेल्या ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने पोलिसांना माहिती दिली. या ट्रकमधून लाख ६१ हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, यादरम्यान ट्रक रिक्षाचालक मालक घटनास्थळाहून पसार झाले. मंगळवारी दुपारी १.३० वाजता ही घटना घडली.

बळीरामपेठेतील एका अरुंद गल्लीत एमएच-१५-एजी-३६८७ या क्रमांकाच्या ट्रकमधून गुटख्याची पोती आली होती. ती पोती एमएच-१९-एस-७३४५ या पॅजोरिक्षात भरण्याचे काम सुरू होते. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीसह आणखी काही छायाचित्रकार तेथे पोहोचल्यानंतर ट्रकचे फोटो काढताच चौघा मजुरांनी तेथून पलायन केले. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याची खात्री झाली. त्यानुसार माध्यमांचे प्रतिनिधी थांबून राहिले अर्ध्या तासाने त्यात पोत्यांमध्ये गुटखा असल्याचे स्पष्ट झाले.

अर्धातास वाट पाहून पोलिसांना बोलावले
मजूरपळून गेल्यानंतर पत्रकार फोटोग्राफर्सनी सुमारे अर्धा तास वाट पाहिली. मात्र, कुणीही समोर येत नसल्यामुळे ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रीतम पाटील यांना फोनवरून ही माहिती दिली. त्यानुसार पाटील यांनी पाच मिनिटांत घटनास्थळ गाठून पोते उघडून पाहिल्यावर त्यात गुटखा आढळून आला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. तेवढ्यात एलसीबीच्या सहायक पोलिस निरीक्षक सरिता कोडापे अन्य चार कर्मचारीही पोहोचले. त्यांनी पाहणी करून ट्रक आणि रिक्षा शहर पोलिस ठाण्यात हलवले.