आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gutkha News In Marathi, Gutkha Factory,Muktainagar, Divya Marathi

मुक्ताईनगरला गुटख्याचा कारखाना केला उद्ध्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/मुक्ताईनगर - मुक्ताईनगरमधील गजानन कॉलनीत विमल गुटख्याचा बनावट कारखाना स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी उद्ध्वस्त केला. दोन लाखांच्या गुटख्यासह साडेसहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
दीपककुमार मूलचंद तोतलानी (वय 34, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) याने काही दिवसांपूर्वीच हे घर भाडेतत्त्वावर घेतले होते. सुरुवातीला तोतलानीने वेफर्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, काही काळानंतर त्याने सचिन राजेंद्र जोशी (वय 22, रा.जळगाव) आणि अक्षय अरुण पालवे (वय 19, रा.मुक्ताईनगर) या दोघांना सोबत घेत बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना सुरू केला. या कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारखान्यावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी एक लाख 99 हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह, मशिनरी मिळून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक किरण शिंदे, गिरधर निकम, नीळकंठ पाटील, संजय पाटील, दिलीप येवले, लीलाकांत महाले, अन्न व सुरक्षा अधिकारी अनिल गुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.