आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटख्याची तस्करी करणार्‍यास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावमार्गे धुळ्याकडे गुटखा घेऊन जात असलेल्या तवेरा कारचालकास अजिंठा चौफुली परिसरात शनिवारी अटक करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा विभाग व पोलिस विभागातर्फे संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त गुटखा पालिकेत ठेवण्यात आला आहे.

औरंगाबादकडून येणार्‍या वाहनातून गुटखा येत असल्याची माहिती अन्नसुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त बी.यू. पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार अजिंठा चौफुलीवर संशयित वाहनांची तपासणी करताना पोलिस कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, सहायक उपनिरीक्षक अकबर खान यांना तवेरा कार (क्र. एम एच 20 सी एच 7699) मध्ये विमल गुटख्याचे 75 पुडे आढळून आले. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील निमगूळ येथील नीलेश शालिग्राम भंडारी (30) यास अटक करण्यात आली आहे. कारवाईत पालिकेतील अन्नसुरक्षा अधिकारी एस.व्ही. पांडे यांनी फिर्याद दिल्यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईप्रसंगी पालिका कर्मचारी प्रदीप पवार, नरेंद्र काळे होते.