आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा लाखाचा गुटखा जप्त, अन्न औषध प्रशासनाची एमआयडीसीत कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एमअायडीसी परिसरातील ईश्वर काॅलनीत दाेन ठिकाणी मंगळवारी अन्न औषध प्रशासन विभागाच्या दोन पथकांनी छापे टाकले. यात लाख २५ हजार ५९२ रुपयांचा गुटखा जप्त करून दाेघांना ताब्यात घेतले अाहे.

अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एम.डी. शहा, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, ए. के. गुजर, निखिल कुळकर्णी, भारत भोसले, आर. डी. पवार यांच्या दाेन पथकाने ईश्वर काॅलनीत कारवाई केली. सकाळी ११.३० वाजता पथकाने राहुल अरुण खैरनार याच्या घरी पहिला छापा टाकला. यात ८५ हजारांचा ८६३ रुपयांचा गुटखा, पान मसाला, तंबाखूचा साठा जप्त केला. तर दुसऱ्या पथकाने नंदकुमार चंदनानी याच्या नाथजी प्रोव्हिजनमध्ये छापा टाकला. यात त्यांनी ३९ हजार ७२९ रुपयांचा गुटखा जप्त केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले अाहे.