आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण कारवाईविरुद्ध रोष; हॉकर्सचा आमदार भोळेंना घेराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘नोहॉकर्स झोन’मध्ये गेल्या काही दिवसांपासून हॉकर्सविरुद्ध धडक कारवाई सुरु आहे. अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना मनपाने काठ्या वाटप केल्याने हॉकर्स संतप्त झाले अाहेत. त्यामुळे शनिवारी चौबे शाळेत कार्यक्रमास आलेल्या आमदार सुरेश भोळे यांना घेराव घालत हॉकर्सने अतिक्रमण विभागाच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला. 
 
प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या आदेशाने सोमवारपासून १५ दिवसांसाठी धडक मोहिम सुरु करण्यात अाली आहे. 

अतिक्रमण विभागासह आता या मोहिमेत सर्व विभागांचे विभागप्रमुख देखील सहभागी झाले आहेत. बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड, शनिपेठ या भागात हॉकर्सवर कारवाई होत अाहे. यामुळे दररोज पथकाकडून हाेणाऱ्या जप्तीमुळे विक्रेत्यांची धावपळ किरकोळ वाद देखील सुरू झाले आहेत. अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने नुकत्याच लाठ्या वाटप केल्या असून यामुळे हॉकर्स संतप्त झाले अाहेत. हॉकर्सला मारण्यासाठी काठ्या दिल्याचा आरोप हॉकर्सनी केला आहे. दरम्यान, सुभाष चौक रस्त्यावरील मनपाच्या चौबे शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी आमदार भोळे शनिवारी आले होते. 

या वेळी हॉकर्सने त्यांना घेराव घातला. तसेच अतिक्रमण विभागाकडून कारवाई करताना आता काठ्यांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी अामदारांना सांगितले. प्रशासनाने फेरीवाला धोरणाची योग्य अंमलबजावणी करता सुरु केलेली कारवाईची मोहिम चुकीची असल्याचा आरोप देखील हॉर्कसनी या वेळी केला. हॉकर्सची गर्दी जमल्याने या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...