आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेक अँड्रॉइड अँप्समुळे हॅकर्स करताहेत मनमानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अँड्रॉइड अँप स्टोअरवर असलेल्या सोशल नेटवर्किंग अँपवर तुमच्या अकाउंटची कॉपी करणारे काही अँप्लिकेशन्स तयार झाले आहेत. या अँप्लिकेशन्समुळे तुम्ही कोणाशी काय बोलता इथपासून ते तुम्ही पाठवलेला प्रत्येक फोटो, व्हिडिओ सर्व्हरवर सेव्ह होतो. हे मेसेज किंवा फोटो फेक अँपमुळे तुमचे खोटे अकाउंट तयार करून पाहता येतात.
हॅकर्सनी या अँप्लिकेशनचा अतिशय चुकीचा वापर करणे सुरू केले आहे. कोणताही नंबर टाकून त्या नंबरधारकाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्यासाठी हे अँप वापरतात. याहून गंभीर बाब म्हणजे, अफवा पसरवणे, आयपी अँड्रेस वापरणे, आक्षेपार्ह मजकूर शेअर करण्यासारख्या गंभीर घटनांसाठी या अँप्सचा वापर होत आहे. या अँप्लिकेशनपासून बचावासाठी कुठल्याही सोशल कनेक्ट अँपचे सत्यता सर्टिफिकेट तपासूनच ते अँप डाऊनलोड करावे. तसेच कुठल्याही एका कारणाला न भाळता जसे फेक अकाउंट तयार होऊ शकते, असे न करता त्या अँपचे फायदे-तोटे तपासून घ्यायला हवे.

एखादे अँप्लिकेशन कितीही सत्यता किंवा प्रायव्हसी पॉलिसी जपणारे असले तरी, त्या अँपवर शक्यतो आक्षेपार्ह मजकूर व स्वत:चे फोटो शेअर करू नयेत. कारण हॅकर्सचा मुख्य उद्देश हा पर्सनल फोटोंचा गैरवापर करण्याचा आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अशा अँप्समुळे हॅकर्स सहज डोकावू शकतात. मात्र, एक जमेची बाजू अशी की, हे अँप्लिकेशन अँप स्टोअरवर उपलब्ध नाही. चुकीच्या पद्धतीने या अँप्सची विक्री होते.