आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालमध्ये जोरदार गारपीट, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - पाल परिसरात रविवारी दुपारी जोरदार गारपीट झाली. गोटीच्या आकारातील गारांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गारबर्डी धरणाच्या परिसरात मासेमारी करताना अंगावर वीज कोसळून ४० वर्षीय मच्छिमाराचा मृत्यू झाला.
रविवारी दुपारी वाजेच्या सुमारास पालसह परिसरातील गुलाबवाडी, गारखेडा, आभोडा या भागात तुरळक पावसासह जोरदार गारपीट झाली. त्यामुळे केळी, गहू, हरभरा मक्यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तहसीलदार कुंदन हिरे यांनी सायंकाळी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली. रावेर शहरातही रविवारी सायंकाळी तुरळक सरी कोसळल्या.