आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावला अवकाळी तडाखा, खान्देशात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धुळे,नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला मंगळवारी सायंकाळी गारपिटीसह मुसळधार पावसाने तडाखा दिला. जोरदार वारा विजेच्या कडकडाटात या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला अाहे.
जळगाव शहरात मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची भंबेरी उडाली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. त्यात अमळनेर, चोपडा, भुसावळ तालुक्यांमध्येही पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, कांदे, पपई, दादर, मका या पिकांना मोठा फटका बसला आहे.
धुळे जिल्ह्याला झोडपले
साक्रीच्यापश्चिम पट्ट्याला गारपिटीने झोडपून काढले. शिंदखेडा तालुक्यातील पाटण, चिमठाणे, नरडाणा आदी भागातही पाऊस झाला.
जामनेरला गारपीट
जळगाव जिल्ह्यातही सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. जामनेर तालुक्यात पाळधी, जलांद्री या गावांमध्ये गारपिटीची तीव्रता अधिक होती.
उत्तर गाेलार्धासह अमेरिका, इंग्लंडपाठाेपाठ काश्मीरमध्येदेखील थंडी वाढली अाहे. ध्रुवीय प्रभावी वाऱ्यांची दिशा बदलली अाहे. (पाेलर जेट स्विम) हे वारे दक्षिणेकडे सरकले अाहेत. त्यामुळे वादळी पाऊस गारपीट हाेत अाहे. अाणखी दाेन दिवस हा प्रभाव राहील, असे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेडचे हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.