आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेसाठी राज्यातील भाविकांचा कोटा वाढणार; 14 पासून आरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र हजयात्रेसाठी यंदा १४ जानेवारीपासून आरक्षण प्रक्रिया सुरू होणार आहे. या यात्रेसाठी सन २०११च्या जनगणनेनुसार कोटा वितरित होणार असल्याने यंदा महाराष्ट्राच्या आरक्षित कोट्यात वाढ होईल, अशी माहिती हज कमिटीच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. गेल्या वर्षी राज्यातील आरक्षित कोट्यातून हजार ३४६ भाविकांना यात्रेची संधी मिळाली होती. मात्र अाता बदललेल्या नियमानुसार यंदाच्या वर्षी आरक्षित कोट्यातून किमान १२०० भाविकांची वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुस्लिम समाजात हज यात्रा अतिशय पवित्र मानली जाते. अायुष्यात एकदा तरी या यात्रेवर जाण्याचा याेग यावा अशी बहूतांश मुस्लिम बांधवांची इच्छा असते. मात्र दरवर्षी राज्य देशातील काही ठराविक भाविकांनाच हजला जाण्याची संधी मिळते. त्यासाठी सरकारने काही काेटा ठरवून दिलेला अाहे. त्यामुळे जाऊ शकणाऱ्या अनेकांचा हिरमाेड हाेत असताे.
सन २०१६मधील हजयात्रेसाठी हज कमिटीतर्फे भाविकांच्या सुविधेसाठी काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील अाणखी काही भाविकांनाही या यात्रेत सहभागाची संधी मिळणार अाहे. नव्या नियमानुसार, यंदा ऑनलाइन पद्धतीने हज यात्रेसाठी इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जातील. या शिवाय यंदा दोनऐवजी अर्जाची केवळ एकच प्रत राज्य हज कमिटीला द्यावी लागेल. यासह अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची गरज नसेल. ज्या भाविकांची यात्रेसाठी निवड होईल त्यांनाच वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे असेल. हजयात्रेसाठी यापूर्वी सन २००१च्या लोकसंख्येनुसार कोटा दिला जात होता. मात्र, यंदापासून सन २०११ च्या जनगणनेनुसार कोटा दिला जाणार आहे. यामुळे भाविकांची संख्या निश्चितच वाढेल. यंदा आरक्षित कोट्यातून हजयात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचे अर्ज १४ जानेवारी ते फेब्रुवारी या काळात स्वीकारले जाणार आहेत.

आरक्षित कोट्याची सोडत
गेल्यावर्षी हजयात्रेसाठी देण्यात आलेल्या कोट्याच्या तुलनेत भाविकांचे आरक्षित कोट्यासाठी अधिक अर्ज प्राप्त झाले होते. यामुळे राज्यात प्रथमच आरक्षित सोडत काढण्याची वेळ आली होती. यामुळे राज्यातील अनेक भाविकांना हजयात्रेपासून वंचित राहावे लागले होते. मात्र, यंदा लोकसंख्येच्या आधारावर कोटा वाढून तो साडेआठ हजारांपर्यंत पोहोचणार अाहे. त्यामुळे मुस्लिम समाजबांधवांना दिलासा मिळेल.

यांना मिळेल प्राधान्य
हजयात्रेसाठीसलग तीन वर्षांपासून अर्ज दाखल करूनही आरक्षित कोट्यात स्थान मिळालेल्या भाविकांना यंदा प्राधान्याने संधी निर्माण होणार आहे. अशा भाविकांनी यंदा हज कमिटीकडे अर्ज करताना गेल्या तीन वर्षांच्या अर्जांची छायांकित प्रत कव्हर क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे, अशी माहिती हज कमिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अताऊर रहेमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. जहीर हुसेन यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना दिली.