आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हल्दीराम’ उत्पादनांची तपासणी; चार नमुने प्रयोगशाळेकडे रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘मॅगी’पाठोपाठ‘हल्दीराम’च्या उत्पादनांची तपासणी करण्याचे आदेश राज्याच्या अन्न औषध प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार न्यू बी.जे.मार्केटमधील विक्रेत्याकडील उत्पादनांची तपासणी गुरुवारी जळगावच्या अन्न औषध प्रशासन अधिका-यांनी केली. त्यात चार नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यात ‘हल्दीराम’च्या उत्पादनांचे वितरण करणारे अधिकृत २२ वितरक आहेत. त्यात महनि्याला साधारणत ५० लाखांवर उलाढाल होत असून, जळगाव जिल्ह्यात ३० लाखांवर होते. नागपूर येथून या मालाचे वितरण होते.

नमुनेतपासणीसाठी : अन्नऔषध प्रशासनाच्या अधिका-यांनी तपासणी करून अन्नसुरक्षा मानके कायद्यांतर्गत चार नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यात कोरडी मूग डाळ, आलू भुजिया, भुजिया शेव, खट्टामिठा नमकीन या नमुन्यांचा समावेश आहे.
हीआहेत उत्पादने : ‘हल्दीराम’चीविविध उत्पादने आहेत. त्यात मूग डाळ, आलू भुजिया, भुजिया शेव, खट्टामिठा नमकीन, बंदिस्त डब्यांमध्ये रसगुल्ला, गुलाब जाम, प्लास्टिकमध्ये सोनपापडी, वेफर्स, टकाटकसह अन्य उत्पादनांचा समावेश आहे.

तपासणीला सहकार्य
हल्दीराम’चीनमकीनसह विविध उत्पादने असून, जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यात त्यांचे वितरण केले जाते. अन्न औषध प्रशासनाकडून नियमानुसार तपासणी केली जात असून, त्यांना सहकार्य केले जाईल. शेखरजाखेटे, अधिकृत विक्रेते

अहवालानंतर कार्यवाही
हल्दीरामच्या उत्पादनांच्या नमुन्यांची तपासणी करून चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. याबाबत प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. संदीपदेवरे, अन्नसुरक्षा अधिकारी