आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमीची मदतीसाठी अर्धा तास याचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवतीर्थ मैदानाजवळ रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता एका तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला. यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तश्राव होत होता. रस्त्यावरून येणारे-जाणारे जखमी तरुणाची फक्त गंमत पाहत होते. पण एकानेही मदतीसाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे तरुण घटनास्थळी तब्बल अर्धा तास पडून होता. त्यानंतर मनपा अारोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी जखमी तरुणाला रिक्षात टाकून एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. 
 
मूळचे दीपनगर येथील प्रतुल गाेपाळ पाटील (वय २६, रा. प्रतापनगर) हा डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात फिजिअाेथेरेपीचे प्रशिक्षण घेत आहे. रविवारी दुचाकीने प्रतुल पाटील शहरातून घराकडे जात असताना शिवतीर्थाजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात तो फेकला गेल्याने डाेक्याला गंभीर दुखापत झाली. वर्दळीचा रस्ता असूनही घटनास्थळी कोणीच थांबत नसल्याने जखमी तरुण मदतीसाठी याचना करीत होता.
 
 अर्ध्या तासानंतर त्याच रस्त्याने महापालिकेचे अाराेग्य अधिकारी डाॅ. विकास पाटील हे जात हाेते. त्यांनी अपघात बघितल्यानंतर थांबून जखमीच्या जवळ जाऊन बघितले. त्यानंतर डाॅ. पाटील डाॅ. निखिल पाटील यांनी तरुणाला घेऊन जाण्यासाठी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहरातील रिक्षावालेही थांबण्यास तयार नव्हते. अखेर यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील रिक्षाचालक हरिभाऊ नरवाडे कामासाठी शहरात आले होते. त्यांनी रिक्षा थांबवून प्रतुल पाटील या जखमी तरुणास डॉ. भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...