आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Half Jalgaon Citizens Live In Prisons Bhalchandra Nemade

जळगावचे अर्धे लोक तुरुंगात राहतात - भालचंद्र नेमाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धुळे शहर सोडून रेल्वे दुसरीकडे वळली. ती जळगावातून गेली. त्यामुळे जळगावचा विकास झाला. अन्यथा जळगावात विकास करण्यासारखे काहीही नाही. जळगावचे अर्धे लोक तुरुंगात, तर अर्धे लोक बाहेर असतात, असे वक्तव्य प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले. शहराचा विकास व्हायचा असेल तर तेथील लोकांपेक्षा सुविधा महत्त्वाच्या असतात, असेही ते म्हणाले.
धुळ्यात एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. त्या वेळी ते म्हणाले की, जळगावला गेलेल्या रेल्वेने त्या शहराला तारले. मुळात जळगाव पुढे जावे, असे त्या शहरात काहीच नव्हते. मात्र, रेल्वेमुळे त्या शहराचे दिवस पालटले. खरे तर त्या शहराची अवस्था काय आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. येथील अर्धे लोक तुरुंगात, तर अर्धे हे बाहेर असतात. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली.