आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेल कोट्यात निम्मे कपातीने ग्राहक हतबल, आधारजोडणी आणि भ्रमणध्वनी लिंकिंगशिवाय रॉकेल नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- रॉकेल कोट्यात निम्मे कपातीने ग्राहक हतबल झाले आहेत. आधारजोडणी आणि भ्रमणध्वनी लिंकिंगशिवाय रॉकेल ग्राहकाला मिळणार नाही. यामुळे काळाबाजाराला आळा बसला आहे. मात्र उज्वला योजनेच्या एलपीजी गॅस धारकांची संख्या वाढत असून कोटा निम्यावर आला आहे. 

आधारजोडणी आणि भ्रमणध्वनी लिंकिंग रॉकेल नाही – यापुढे रेशन दुकानांवरील काळा बाजाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता रेशनवरून अनुदानित रॉकेल घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपले आधार कार्ड, तसेच मोबाइल क्रमांक सादर करावे लागणार आहेत. अन्यथा त्यांना देण्यात येणारा रॉकेलचा कोटा बंद करण्यात येणार आहे.

 रॉकेल घेण्यास पात्र असलेल्यांना आधार कार्ड, मोबाइल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदार किंवा केरोसिन विक्रेते यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. केंद्र शासन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग यांच्या शासन निर्णयानुसार केरोसिन मिळण्यास पात्र लाभार्थींचे आधार क्रमांक संकलित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य शासानाने अनुदानित केरोसिन मिळण्यास पात्र लाभार्थींचे आधार क्रमांक संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आधार कार्डाचा क्रमांक आणि मोबाइल क्रमांक सादर न करणाऱ्या लाभार्थींना रॉकेलचा कोटा देऊ नये अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. लाभार्थींचा कोटा राखीव ठेवण्यात यावा. तरीही लाभार्थींनी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक दिले नाहीत तर त्यांचा कोटा रद्द करण्यात येणार आहे. जे लाभार्थी आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक सादर करणार नाहीत.
 अनुदानित रॉकेल घेण्यास पात्र ठरणार नाही. रेशन दुकानावर एका कुटुंबाला चार लिटर रॉकेल दिले जाते, मात्र गेल्या काही दिवसात उज्वला योजनेचे एलपीजी गॅस धारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात तालुक्याला मिळणाऱ्या रॉकेलच्या कोट्यातही घट होत आहे.
 
कुटुंबप्रमुखाचा संपर्क क्रमांक
आधार कार्डाच्या क्रमांकासोबत शक्यतो कुटुंबाच्या प्रमुखाच्या मोबाइल क्रमांकाची नोंद करण्यात येणार आहे. कुटुंबप्रमुखाकडे मोबाइल नसल्याच कुटुंबातील कोणत्याही एका लाभार्थीचा क्रमांक घेण्यात येणार आहे. लाभार्थींना ही माहिती रेशन दुकानावर किंवा तहसील कार्यालयात द्यावी लागणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोणत्या लाभार्थ्याला आपण किती रॉकेल दिले, किती लोकांना लाभ मिळाला, याची माहिती मिळणार आहे.
 
तालुक्यातील एकूण होलसेल विक्रेते – ६
 
शहर - ४ 
 
ग्रामीण – २
 
तालुक्यातील किरकोळ विक्रेते – ३२०
 नवीन शासन नियमानुसार ज्या ग्राहकांचे आधार जोडणी आणि भ्रमणध्वनी क्रमांक येत असलेल्या याद्या येत आहे त्यांनाच कोटा मिळत आहे. त्यामुळे सध्या ४२ हजार लिटर देण्यात येत आहे. आधी ९६ हजार लिटर मिळत आहे. यामुळे काळ्याबाजाराला आळा बसणार आहे. – प्रदीप पाटील तहसीलदार अमळनेर
बातम्या आणखी आहेत...