आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल दुनिया मार्गावरील हॅलोजन दिवे पडले बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील उत्तर आणि दक्षिण भागातील नागरिकांची रेल दुनिया भागातील बोगदा खुला झाल्याने सुविधा झाली आहे. या परिसरात नगरसेवकांनी दोन्ही बाजूने हॅलोजन लॅम्प लावले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बहुतांश हॅलोजन लॅम्प बंद असल्याने वाहनधारकांसह नागरिकांची गैरसाेय होत आहे.

दगडी पूल विस्तारीकरणामुळे रेल दुनिया भागातील बोगद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, हॅलोजन दिवे बंद पडल्याने बोगद्याच्या दोन्ही बाजूकडील मार्गांवर रात्री अंधार असतो. त्यामुळे महिला वाहनधारकांना सायंकाळनंतर या मार्गावरून जाणे दुरापास्त झाले आहे. स्थानिक नगरसेवकांनी पदरमोड करून मार्गांवर हॅलोजन दिवे लावले होते. मात्र, योग्य देखभालीअभावी बहुतांश हॅलोजन लॅम्प बंद पडल्याने समस्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी बंद पडलेल्या हॅलोजन दिव्यांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेणे गरजेचे असून, समाजसेवी संस्थांचा पुढाकार यासाठी अपेक्षित आहे.

दुरुस्ती केली
प्रभाग क्रमांक चारच्या मार्गावरील हॅलोजन लॅम्प बंद पडले होते. याची माहिती मिळताच बंद पथदिव्यांची दुरुस्ती केली. शारदा धांडे, नगरसेविका,भुसावळ