आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंगावर मात करत धावण्याच्या स्पर्धेत मिळविले सुवर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जगाच्यापाठीवर आपलेही नाव कोरले जावे, इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपणही काहीतरी करून दाखवावे ही जिद्द मनाशी बाळगून वयाच्या आठव्या वर्षांपासून गायत्री मधुकर चौधरी (इयत्ता पाचवी, रा. जुने जळगाव) आणि अनिल रवींद्र पाटील (सहावी, रा.म्हसावद) हे दोघे धावपटू धावण्याच्या विविध शर्यती गाजवत आहेत.

शाळेच्या अभ्यासक्रमासह अनेक उपक्रमांमध्ये पारंगत असलेल्या गायत्री आणि अनिल यांनी सलग तीन वर्षे मूकबधिर विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून स्वत:ला सिद्ध केले आहे. मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या मोठ्या शहरातील स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. त्यांच्या या अफलातून पराक्रमामुळे आता संस्थेने त्यांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. या पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना पाठवण्याची तयारी संस्थेने केली आहे. केवळ जिंकणे नाही, तर त्यात सातत्य ठेवण्याचा टप्पा ते यशस्विरीत्या पार पाडत आहेत.
दररोजएक तास सराव : गायत्रीही जुने जळगावात राहते. सकाळी ९.३० वाजता ती शाळेत पोहोचल्यानंतर एक तास धावण्याचा सराव करते, तर अनिल हा श्रवण विकास मंदिरातील निवासी विद्यार्थी आहे. तो पहाटे वाजता सराव करतो. सरावात अडचणी येऊ नये, म्हणून त्यांना शानभाग विद्यालयाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. अधूनमधून स्वत:ची क्षमता ओळखता यावी, यासाठी इतर विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा लावून कसरत करून घेत आहेत. शाळेतील शिक्षक त्यांच्यावर मेहनत घेत आहेत.
वेगवानधावपटू म्हणून ओळख : अमरावतीयेथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीस वितरणाच्या वेळी या दोघांना वेगवान धावपटू म्हणून गौरवले आहे. सलग तीन वर्षे सुवर्णपदकावर नाव कोरल्यामुळे त्यांची राज्यातील सर्वच मूकबधिर शाळा, संस्थांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

लिटील आयकॉन
मूकबधिरपणा असूनही धावण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्षांपासून विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रवण विकास मंदिराचे िवद्यार्थी गायत्री चौधरी आणि अनिल पाटील हे सुवर्णपदक पटकावत आहेत.