आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: हनुमान जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाईने शहरात सजली मंदिरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हनुमानजयंती मंगळवारी साजरी करण्यात येत अाहे. त्या अनुषंगाने शहरातील हनुमान मंदिरांत धार्मिक कार्यक्रम अायाेजित करण्यात अाले अाहेत. तसेच जयंती उत्सवाकरिता मंदिरांना रंगरंगाेटी करून अाकर्षक सजावट करण्यात अाली अाहे. याशिवाय भंडाऱ्यांचेदेखील अायाेजन करण्यात अाले अाहे.
 
शहरात माेठ्या प्रमाणात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाताे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या अाठवडाभरापासून मंदिरांना सजविण्यात येत अाहे. मंदिरांत दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी हाेत असल्याने त्यादृष्टीने ट्रस्टने नियाेजन केले अाहे. तसेच फुले, हार, प्रसाद अादीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठीदेखील वेगळी व्यवस्था करण्यात अाली अाहे. साेमवारी पंचमुखी हनुमान मंदिराच्या साफसफाईचे काम सुरू हाेते, तर नवीपेठेतील सालासर हनुमान मंदिर, जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिर, शिवाजीनगर पुलाजवळील हनुमान मंदिर, जुने गावातील हनुमान मंदिर, शंकरअाप्पानगरातील कष्टभंजन हनुमान मंदिरासह पिंप्राळा, रिंगराेड मेहरूण परिसरातील हनुमान मंदिरांतदेखील जयंती उत्सवाची तयारी सुरू हाेती.
 

श्री हनुमान मंदिर सप्तशृंगीदेवी मंदिरात (रिंगराेड, जेडीसीसी बंॅकेजवळ) स्वरवेध फाउंडेशन ग्रुपतर्फे सायंकाळी वाजता ग.दि.माडगूळकरलिखित गीतरामायण इतर देवतांवर अाधारित भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. ‘स्वरवेध’चे गायक कलावंत भागवत पाटील इतर कलावंत हा कार्यक्रम सादर करणार अाहेत. निवेदन ज्याेती पाटील करतील, असे अध्यक्ष विजय पाटील यांनी कळविले अाहे.
 
शहरात विविध ठिकाणी भंडारा
शहरातील अनेक मंदिरांतर्फे हनुमान जयंती उत्सवाला भंडाऱ्यांचे अायाेजन करण्यात अाले अाहे. यात नवीपेठ परिसर, माेहाडी राेडवरील रायसाेनीनगर येथे श्री जागृत हनुमान मंदिर, वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे अनुराग स्टेट बंॅक काॅलनी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम हाेणार अाहे. साेमवारी भंडाऱ्यांची जाेरदार तयारी सुरू हाेती. यासाठी मंडळांतर्फे विशेष समित्या गठीत करण्यात अाल्या अाहेत.

महर्षी वाल्मीकनगर मंडळातर्फे मंगळवारी सकाळी ४.४५ वाजता वाल्मीकनगरातील हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे हनुमान जन्म काकडा आरती, ६.३० वाजता लघुरुद्र महापूजा तर ११ वाजता महापूजा होऊन महाप्रसादाचे वाटप होणार आहे. रात्री ८.३० ते ११ वाजता मालेगाव येथील चौपटपाडा येथील शरद महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे, असे अध्यक्षांनी कळवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...