आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान जयंतीची पूजा करता येणार; ग्रहणानंतर, पाैर्णिमाला करता येईल कुळाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हनुमान जयंतीला म्हणजे एप्रिलला चंद्रग्रहण हाेणार आहे. त्याच दिवशी चैत्र शुद्ध पाैर्णिमा आली आहे. या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये देवाचा कुळाचार, कुळधर्म केला जाताे. मात्र, ग्रहणाच्या दिवशी कुळाचार करता येत नाही. त्यामुळे ग्रहणानंतर मंगळवारी, शुक्रवारी, पाैर्णिमा अष्टमीला हा कुळाचार करता येणार असल्याचे पंडितांनी सांगितले.

ग्रहणानंतर कुळाचार करता येणार असल्याने खंड पडणार नसल्याने कुळाचार पूर्ण हाेतील. चंद्रग्रहण दुपारी ३.४५ मिनिटांनी सुरू हाेईल. ५.३० वाजता ग्रहणाचा मध्य असेल. सायंकाळी ७.१५ वाजता ग्रहण सुटणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असून याला ग्रस्ताेदित म्हटले जाते. नेहमीप्रमाणे हे खग्रास चंद्रग्रहण असून दिवसा आल्याने ते पूर्णपणे दिसू शकणार नाही.
शनिवारी सूर्याेदयापासूनच ग्रहणाचे वेध लागत असून माेक्षापर्यंत हे राहणार आहेत. ज्याेतिषशास्त्रानुसार अनेकजण ग्रहणासंबंधी काही नियम पाळतात. यात अन्नग्रहण करता येत नाही तर स्नान, देवपूजा, नित्यक्रम, श्राद्ध करता येणार आहे. तसेच बालक, आजारी, अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांनी हे नियम सकाळी ११ वाजेपासून पाळावे. ग्रहण काळात झाेपू नये तसेच चंद्राेदय हाेताच स्नान करावे, पुण्य काळात देवपूजा, श्राद्ध, तर्पण दान करावे, माेक्षानंतर स्नान करावे, असे ज्याेितषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

पुढे वाचा... जास्तीत जास्त देवकार्य करावे