आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात \"हॅप्पी स्कूल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गणित,भूमितीमध्ये बेरीज-वजाबाकी करणे आकृत्या काढणे, इंग्रजीमध्ये स्पेलिंग पाठ करणे अन् इतिहासातील सनावळ्या जुन्या घटना लक्षात ठेवणे याचा मुलांना कंटाळा येतो. त्यामुळे सुटीच्या दिवस म्हणजे रविवार हा त्यांना आवडीचा वाटतो. शाळेबाबतचा कंटाळा घालवून आल्हाददायी वातावरण तयार करण्यासाठी हॅप्पी स्कूलची संकल्पना पुढे आली आहे. जळगावात महाराष्ट्रातील पहिली "हॅप्पी स्कूल' पालिकेच्या शाळा क्रं.५मध्ये तयार झाली आहे.

रोटरी क्लबने २०१४ ते २०१७ हे ‘हॅप्पी स्कूल’ बनवण्यासाठी जाहीर केले आहे. चार वर्षांत ‘राष्ट्रीय साक्षरता अभियान’ अंतर्गत भारतातील जेवढे क्लब आहेत त्यांना पालिका, महापालिका जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेऊन त्या हॅप्पी स्कूल बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत; परंतु जळगावातील इनरव्हील क्लब ऑफ ईस्टने रोटरीचे धोरण जाहीर होण्याआधीच ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी पोलिस वसाहतीमधील मनपा शाळा क्रमांक ही सन २०११-२०१२मध्ये दत्तक घेऊन महाराष्ट्र राज्यातील हॅप्पी स्कूल बनवली आहे. इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३०च्या पुरस्कार वितरण समारंभात या शाळेचा हॅप्पी स्कूलचा दर्जा प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी क्लबच्या संगीता अग्रवाल, माधवी आसावा, सुधा काबरा, संगीता तोतला, मीनल लाठी या पाचही अध्यक्षांनी विशेष परिश्रम घेतले आहे. या शाळेचे मुख्याध्यापक शांताराम साळुंखे आहेत. नोव्हेंबर २०१४मध्येच तत्कालीन अध्यक्षा लाठी यांनी डिस्ट्रिक्टला राष्ट्रीय साक्षरता अभियानाच्या समन्वयक बिना व्यास यांना शहरात हॅप्पी स्कूल तयार केल्याचा तसा प्रस्ताव पाठवला होता.

विद्यार्थी रिमांड हाेममधील असल्याने नावे गोपनिय ठेवण्यात आली आहेत.
पोलिस वसाहतीतील मनपा शाळा क्रमांक ५मध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. यात १२० मुले रिमांड होममधील आहेत. शाळेत क्लबने अॅक्वागार्ड पाण्याचे सिस्टीम, वॉटर कुलर, पाण्याची टाकी, मुलांना खेळण्यासाठी लागणारे साहित्य, बाक, संपूर्ण शालेय साहित्य, एक मेडिकल किट, मुलांना दररोज लागणाऱ्या दैनंदिन वस्तू (उदा. नेलकटर, कंगवा) दिल्या आहेत.

क्लबतर्फे शाळेत या सुविधा
शाळेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक कार्यक्रम हाेतात. त्यामुळे शाळेत वेगळा अानंद मिळताे उत्साहदेखील वाटताे. तसेच

खूप शिकायला मिळते. एकविद्यार्थी
खूप काही गाेष्टींचे प्रशिक्षण अाम्हाला मिळाले अाहे. त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. प्रत्येक जण शाळा सुंदर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकविद्यार्थिनी,

शासनाचीही मदत
‘सर्वशिक्षा’ अंतर्गत मुलांना ज्या काही सुविधा मिळायला हव्यात यासाठी क्लबच्या सदस्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी चांगली मदत केली. त्यामुळेच तर यावर्षी शासनाकडून मुलांना गणवेश मिळाला. तसेच भिंती रंगवून मिळण्यासह आकर्षक रंगीबेरंगी बेंचेसही मिळाले आहे.
आठवड्यातून एक दिवस वेगळे उपक्रम
मुलांच्याबौद्धिक, शैक्षणिक प्रगतीसह त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा हाेईल, यासाठी क्लबच्या सदस्यांनी खूप प्रयत्न केले आहे. यासाठी ते आठवड्यातून एक दिवस मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. यात मेंदी, रांगोळी, गरबा, दिवा बनवणे, ग्रीटिंग कार्ड बनवणे, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, क्ले माॅडेलिंग, आर्टिफिशयल फ्लॉवर बनवणे, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे यासारखे उपक्रम घेण्यात आले. स्वातंत्र्यदिन, साक्षरता दिन, दिवाळी, शिक्षक
दिन सण साजरे करण्यात येतात.
हॅप्पी स्कूलसाठी प्रत्येक सदस्याने सहभाग नोंदवला. ज्या व्यक्तीला जे काही येते ते त्याने शिकवले. दर आठवड्याला एक उपक्रम व्हायचा, त्यात मुले उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे आमचे मिशन फत्ते झाले आहे. मीनललाठी, माजी अध्यक्षा, इनरव्हील ईस्ट

काय आहे हॅप्पी स्कूल?
शाळेतमुलांना बसण्यासाठी चांगले बेंचेस, ग्रंथालय, स्वतंत्र शिक्षक दालन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, भिंती सुविचार, पेंटिंगने रंगलेल्या, शाळा चकाचक ठेवून आल्हाददायी वातावरण निर्माण करणे आदी गोष्टींचा हॅप्पी स्कूलमध्ये समावेश होतो. यासाठी सात नियम देण्यात आले आहे. हे सर्व निकष इनरव्हील क्लबने पूर्ण केले आहे.