आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hariyan, Amaravati Police In Jalgaon For Ganesh Festival

गणेशोत्सव: हरियाणा, अमरावतीहून मागविली पोलिस कुमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेने कंबर कसली आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असल्यामुळे हरियाणा आणि अमरावतीहून पोलिस कुमक मागविण्यात आली आहे.

शहरातील गणेश मंडळाची संख्या लक्षात घेता पोलिस प्रशासनाला गृहरक्षक दलाचीही मदत होणार आहे. गृहरक्षक दलाचे 1400 कर्मचारी पोलिसांच्या मदतीला आहेत. निवडणूक आटोपल्यानंतर आता गणेशोत्सवात शांतता राखण्याचे
आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात तीन हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरास पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेसाठी दररोज सायंकाळी प्रत्येक मंडळाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. विशिष्ट भागात जास्त बंदोबस्त देण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. या शिवाय गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकंदरीतच गणेशोत्सव शांततेत पार पडण्याची धडपड सुरू आहे.

सोनसाखळीचोरांवर विशेष लक्ष
शहरात गेल्या सहा महिन्यात मोठय़ा प्रमाणावर सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठ दिवसात पाच सोनसाखळी चोरीस गेल्या आहेत. अशा परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरट्यांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पायी चालत मिरचीपूड डोळ्यात फेकून सोनसाखळी चोरणारा चोरटा नुकताच पोलिसांच्या हाती लागला आहे. मात्र दुचाकीवरून हात साफ करणारे चोरटे अद्याप सापडलेले नाहीत.