आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगा हाेत नसल्याने विवाहितेचा केला छळ, सासरच्‍या 6 जणांविरुध्‍द गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मुलीच झाल्या. मुलगा हाेत नाही या कारणावरून सासरच्या लाेकांकडून विवाहितेचा छळ करण्यात अाला. या प्रकरणी रायगड, मुंबई येथील सहा जणांविरुद्ध पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
अाम्रपाली नरेश काेचुरे (वय २५) रा. शिवाजीनगर, घरकुल रायगड, ह.मु. चिताेड यांनी पाेलिसांत तक्रार दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, लग्नानंतर चार महिन्यांपासून अापला सासरी छळ हाेत अाहे. त्यात अापल्याला मुली झाल्या. मुलगा हाेत नाही अाणि कर्जफेडीसाठी माहेरून पाच लाख रुपये अाणावे या कारणावरून अापला पती नरेश बारसू काेचुरे, सासू कमलबाई बारसू काेचुरे, सासरे बारसू तुकाराम काेचरे, दीर मुकेश बारसू काेचुरे (रा. शिवाजीनगर घरकुल,रायगड), नितीन उर्फ दीपक बारसू काेचरे, विद्या नितीन उर्फ दीपक काेचुरे (रा.मुंबई) यांच्याकडून शारीरिक, मानसिक छळ करीत तुला वागवणार नाही, असे सांगत शिवीगाळ करून उपाशी ठेवीत अापला शारीरिक मानसिक छळ केला. 

तसेच मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अापल्या अंगावरील दागिनेही काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. अाम्रपाली काेचुरे यांच्या तक्रारीवरून या सहा जणांविरुद्ध तालुका पाेलिस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास सहायक उपनिरीक्षक के.एम. दामाेदर करीत अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...